पैशामुळे दोस्तीत वाद, मित्राला रॉडने मारहाण, जागेवर संपवलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
वर्ध्याच्या भिडीत युवकाची हत्या करण्यात आली आहे. पैशाच्या वादातून रॉडने मारत मित्रानेच मित्राची हत्या केली.
नरेंद्र मते, प्रतिनिधी, वर्धा : वर्ध्याच्या भिडी इथे पैशाच्या देवाण घेवाणीतून युवकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडलीय. आदित्य शिरभाते याचे गावातील राहुल गावंडे याच्याशी पैशाचा वाद होता. याच वादातून राहुल याने आदित्यला रॉडने मारहाण करून त्याची हत्या केली. आरोपी राहुल गावंडे यास पोलिसांनी अटक केली आहे.
शुक्रवारी भिडी येथे आरोपी राहुल गावंडे याने आदित्य शिरभाते याचा खून केला आहे, अशा माहितीवरून घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह पोहचून आरोपी राहुल दिलीप गावंडे (वर्ष 33) यास ताब्यात घेतले. फिर्यादी यांना विचारपूस करून आरोपीने जुन्या पैशाच्या वादावरून, भांडण होऊन आदित्य बबनराव शिरभाते (वर्ष 26) रा. भवानी मंदिर चौक, भिडी याचा खून केला असल्याचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद केला असून, आरोपीस घटनास्थळा वरून अटक करण्यात आले.
advertisement
घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कारखेले, ठाणेदार अमोल मंडळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव करीत आहोत.
पोलीस स्टेशन देवळी येथील पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे, नितीन तोडासे, सागर पवार, मनोज नप्ते, गणेश खेवले यांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
November 15, 2025 3:23 PM IST


