मलायकाचं काय घेऊन बसलात, वयाच्या 51व्या वर्षी बाइक राइड करणाऱ्या मराठी अभिनेत्रीला पाहिलं का! VIDEO

Last Updated:

Marathi Actress Bike Ride : अभिनेत्री सई ताम्हणकर पॅराग्लाइडिंगचं शिक्षण घेताना दिसली होती. अनेक अभिनेत्री ट्रेकिंगला जातात. अशीच ही मराठी अभिनेत्री जी बुलेटला किक मारून थेट बाइक राइडला निघाली आहे.

News18
News18
90चं दशक गाजवणाऱ्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री आता त्यांच्या पन्नाशीत आल्या आहेत. वयाच्या पन्नाशीतही त्या तितक्याच मनमोहक आणि फिट दिसतात. अभिनेत्री मलायका अरोरा ही त्यातीलच एक अभिनेत्री आहे. पण मलायकाला काय घेऊन बसलात 51 वर्षांच्या मराठमोळ्या अभिनेत्रीला पाहिलं का. ती बाइक राइड करत सुसाट निघाली आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. 51 व्या वर्षी सुसाट बाइक राइड करणारी ही मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?
अनेक मराठी कलाकार हे अभिनयाबरोबरच अनेक गोष्टी करताना दिसतात. अभिनेत्री सई ताम्हणकर पॅराग्लाइडिंगचं शिक्षण घेताना दिसली होती. अनेक अभिनेत्री ट्रेकिंगला जातात. अशीच ही मराठी अभिनेत्री जी बुलेटला किक मारून थेट बाइक राइड ला निघाली आहे.
advertisement
"मी अजूनही ती हवा फिल करतेय. त्या स्वच्छ हवेचा सुगंध अजूनही दरवळतोय. मन शांत आहे, सगळे आवाज जणू म्यूट झालेत. काय अप्रतिम सफर होती ती…!!! चिअर्स गर्ल… एक शिट्टी मार, पुढची राइड लगेच करूया, लव्ह", असं म्हणत अभिनेत्रीनं तिच्या बाइक राइडचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
बुलेटवर बाइक राइड करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी आहे. सोनालीनं तिच्या इन्स्टाग्रामला राइडिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. राइड जॅकेट्स, बाइकला लगेज बांधून सोनाली बाइक राइडला निघाली. निसर्गाचा मनमुराद आनंद घेत सोनालीनं ही बाइक राइड पूर्ण केली. ती प्रचंड खुश दिसली.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)



advertisement
सोनालीचं हे अडव्हेंचर पाहून चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं आहे. तू ग्रेट आहेत, जबरदस्त, कमाल, दबंग मैत्रीण, माय रॉकस्टार असं म्हणत चाहत्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. एकंदरीत 51 वर्षांच्या सोनालीसमोर बॉलिवूडची मलायका देखील फिकी पडली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तिला हॅलो नॉक नॉक कौन है हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सोनालीचे अनेक प्रोजेक्ट पाइललाइनमध्ये आहेत. सोनाली फक्त बाइक राइडिंग करत नाही तर लायकलिंगही करत असते. बाइक राइडिंग आणि सायकलिंगचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मलायकाचं काय घेऊन बसलात, वयाच्या 51व्या वर्षी बाइक राइड करणाऱ्या मराठी अभिनेत्रीला पाहिलं का! VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement