OTT वर Netflix च्या या सीरिजने 2025 मध्ये केलाय धमाका, 145.8 मिलियन व्ह्यूजसह ठरली नंबर 1

Last Updated:

OTT Web Series : 2025 मध्ये रिलीज झालेल्या Netflix च्या एका सीरिजने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. तसेच 2025 मधील सर्वाधिक व्ह्यूज मिळवणारी सीरिजही ही ठरली आहे.

News18
News18
OTT Web Series : 2025 मध्ये OTT आणि थिएटरमध्ये अनेक सीरिज आणि चित्रपट रिलीज झाले. काही हिट झाले, तर काही फ्लॉप ठरले. मात्र OTT प्लॅटफॉर्मवर ‘स्क्विड गेम्स 3’ पासून ‘वेडनेसडे सीझन 2’ आणि ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ पर्यंत अशा अनेक सीरिज होत्या ज्यांची जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या लोकप्रिय सीरिजचे नवे सीझन रिलीज होताच त्यांनी Netflix वर वर्चस्व गाजवले. मात्र यापैकी एक अशी वेब सीरिज आहे, जी परदेशातच नाही तर भारतातही मोठ्या प्रमाणावर पाहिली गेली आणि 2025 मधील Netflix वरील सर्वाधिक पाहिली जाणारी सीरिज ठरली. 2025 मध्ये Netflix वर सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज कोणती जाणू घ्या...
स्क्विड गेम्स 3 (Squid Games 3) : Netflix ची कोरियन ड्रामा सीरिज ‘स्क्विड गेम्स 3’ ही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रेक्षकांची आवडती ठरली. या सीरिजचे तीन सीझन आले असून पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. तिसऱ्या सीझनला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, तरीही ग्लोबल प्रेक्षकांकडून सर्वाधिक व्ह्यूज मिळवण्यात ही सीरिज यशस्वी ठरली. या सीरिजला जागतिक स्तरावर 145.8 मिलियन व्ह्यूज मिळाले असून ती 2025 मधील सर्वाधिक पाहिली जाणारी सीरिज ठरली आहे.
advertisement
अडोलेसन्स (Adolescence) : ब्रिटिश टेलिव्हिजन सायकोलॉजिकल क्राइम ड्रामा सीरिज ‘अडोलेसन्स’ तिच्या पहिल्या सीझनसह आली. या सीरिजचे दिग्दर्शन फिलिप बरांटिनी यांनी केले आहे. या कथेचा केंद्रबिंदू 13 वर्षांचा जेमी मिलर नावाचा मुलगा आहे. ज्याला शाळेतील एका मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते. या सीरिजचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतो. Netflix वर या सीरिजला 142.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
advertisement
वेडनेसडे 2 (Wednesday Season 2) : सुपरनॅचरल मिस्ट्री कॉमेडी अमेरिकन सीरिज ‘वेडनेसडे’ 2025 मध्ये तिच्या दुसऱ्या सीझनसह परतली. ही सीरिज प्रसिद्ध टेलिव्हिजन पात्र वेडनेसडे अ‍ॅडम्सवर आधारित आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’प्रमाणेच ही सीरिजही दोन भागांमध्ये रिलीज करण्यात आली. जेना ऑर्टेगा यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘वेडनेसडे’ सीझन 2 ला Netflix वर 119.3 मिलियन व्ह्यूज मिळाले.
advertisement
स्ट्रेंजर थिंग्स 5 (Stranger Things Season 5) : अमेरिकन सायन्स फिक्शन हॉरर ड्रामा सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या पाचव्या सीझनची चाहते दीर्घकाळापासून वाट पाहत होते. या सीझनचे काही एपिसोड 26 नोव्हेंबर रोजी रिलीज झाले, तर उर्वरित एपिसोड 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहेत. सीरिज रिलीज होताच Netflix जवळपास क्रॅश झाल्याची चर्चा होती. या सीरिजला Netflix वर सुमारे 115.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
advertisement
द नाईट एजंट सीझन 2 (The Night Agent 2) : अमेरिकन अ‍ॅक्शन थ्रिलर सीरिज ‘द नाईट एजंट’चा दुसरा सीझन यावर्षी 23 जानेवारी रोजी रिलीज झाला. 10 एपिसोड असलेल्या या सीरिजमध्ये गॅब्रिएल बासो, लुसिएन बुकानन आणि फोला इव्हान्स यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजला Netflix वर 94.1 मिलियन प्रेक्षकांनी पाहिले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT वर Netflix च्या या सीरिजने 2025 मध्ये केलाय धमाका, 145.8 मिलियन व्ह्यूजसह ठरली नंबर 1
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement