बॉयफ्रेंडसमोरच Kiss अन्... सिंगरच्या मिठीत गर्लफ्रेंड तारा सुतारिया, पाहून रागानं लालबुंद झाला वीर पाहारिया, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पाहारिया यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तारानं बॉयफ्रेंडच्या समोरच सिंगरला मिठी मारली अन् त्यानंतर किस करतानाही दिसली.
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि तिचा बॉयफ्रेंड वीर पाहारिया गेली अनेक महिने एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या रिलेशनची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये आहे. दोघांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात. लवकरच ते लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान तारा सुतारिया आणि वीर पाहारिया यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. वीरा हा ताराच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे हे यात पाहायाला मिळालं. तारा आणि वीर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
26 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लों (AP Dhillon) यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. या कॉन्सर्टला तारा सुतारिया बॉयफ्रेंड वीर पाहारियासोबत आली होती. कॉन्सर्टदरम्यान तारा फक्त प्रेक्षक राहिली नाही. तिने थेट स्टेजवर एन्ट्री घेत एपी ढिल्लोंसोबत परफॉर्म करतानाही दिसली. दोघांनी मिळून 'थोड़ी सी दारू' हे गाणं गायलं.
advertisement
गायक एपी ढिल्लो यानं ताराचा हात धरून तिला स्टेजवर आणलं. त्यानंतर त्याने तिच्या कंबरेत हात घातला. तिला जवळ घेतलं आणि किस केलं. गायकासोबत तारा देखील खूप उत्साही दिसली. तिने देखील त्याच्या गळ्यात हात टाकून गाणं एन्जॉय केलं.
advertisement
परफॉर्मन्सदरम्यान हे सगळं सुरू असताना दुसरीकडे वीर पाहारिया हे सगळं पाहत होता. आपल्या गर्लफ्रेंडला गायकाच्या इतकं क्लोज गेलेलं पाहून वीर पाहारियाचा तीळ पापड होत होता. हा सगळा प्रकार पाहून वीर पाहारियाला काय करू आणि काय नको असं झालं आहे. त्याला सुरू असलेला प्रकार अजिबात आवडलेला नाही हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे, असं नेटकऱ्यांनी केलं आहे.
advertisement
Tara Sutaria hugs and kisses AP Dhillon while her poor bf Veer Pahariya is watching them in audience.
If the roles were reversed and Veer was doing this to another girl while Tara watched, the internet would have cancelled him in 5 minutes pic.twitter.com/EPgab74qtK
— Chota Don (@choga_don) December 27, 2025
advertisement
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तारा सुतारियाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. हाच प्रकार जर वीर पाहारियाने केला असता इंटरनेटवर प्रचंड गदारोळ झाला असता असं म्हणत ताराला ट्रोल करण्यात आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणावर तारा सुतारिया, वीर पाहारिया किंवा एपी ढिल्लों यांच्याकडून कोणतीही रिअँक्शन आलेली नाही. तारा सुतारिया आणि वीरा पाहारिया हे बॉलिवूडचे हॉट कपल म्हणून ओळखले जातात. ऑगस्ट महिन्यात त्यांनी त्यांच्या रिलेशनची माहिती दिली होती. त्यानंतर दोघे सातत्यानं चर्चेत आहेत. वीर पाहारिया हा शिखर पाहारियाचा भाऊ आहे. शिखर हा अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे. जान्हवी आणि शिखर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉयफ्रेंडसमोरच Kiss अन्... सिंगरच्या मिठीत गर्लफ्रेंड तारा सुतारिया, पाहून रागानं लालबुंद झाला वीर पाहारिया, VIDEO











