एकाच नावाने तब्बल 6 वेळा बनवला सिनेमा, 3 मध्ये तर हिरोही सेमच, तरीही केली छप्परफाड कमाई

Last Updated:

एकाच नावाचे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होतात. अर्थात प्रत्येक चित्रपटाला नेहमीच यश मिळतं असं नाही; पण एक चित्रपट याला अपवाद म्हणता येईल.

एकाच नावाचे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होतात. अर्थात प्रत्येक चित्रपटाला नेहमीच यश मिळतं असं नाही; पण एक चित्रपट याला अपवाद म्हणता येईल.
एकाच नावाचे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होतात. अर्थात प्रत्येक चित्रपटाला नेहमीच यश मिळतं असं नाही; पण एक चित्रपट याला अपवाद म्हणता येईल.
बॉलिवूडमध्ये देवदास, अग्निपथ, डॉन असे अनेक चित्रपट वेगवेगळ्या काळात तयार झाले असून, जुन्या आणि नव्या अशा सगळ्या चित्रपटांना भरपूर यशही मिळालं. एकाच नावाचे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होतात. अर्थात प्रत्येक चित्रपटाला नेहमीच यश मिळतं असं नाही; पण एक चित्रपट याला अपवाद म्हणता येईल. हॉरर विभागात बसणारा हा चित्रपट म्हणजे ‘राज.’ बॉलिवूडमध्ये या नावाचे सहा चित्रपट आले आणि ते सगळे सुपरहिट ठरले.
अगदी राजेश खन्नाच्या ‘राज’पासून ते अलीकडेच म्हणजे २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘राज’पर्यंत बॉलिवूडमध्ये या नावाचे एकूण सहा चित्रपट आले. विशेष म्हणजे त्या सगळ्या चित्रपटांनी चांगली कमाईही केली. ‘इंडिया टीव्ही’ने त्याबाबतची माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
२००२ साली आलेला बिपाशा बासूचा ‘राज’ हा थरकाप उडवणारा चित्रपट ठरला. त्याआधी आलेला राजेश खन्नाचा ‘राज’ही त्याच धाटणीचा होता. या सगळ्या ‘राज’ची जादू प्रेक्षकांच्या मनावर पडली होती. त्यापैकी तीन चित्रपटांमध्ये इम्रान हाश्मीने काम केलं होतं, तर दोन चित्रपटांमध्ये बिपाशा बासू होती.
advertisement

१९६७ मधला ‘राज’

राजेश खन्ना आणि बबिता यांच्या प्रमुख भूमिका असलेला पहिला ‘राज’ हा चित्रपट १९६७ मध्ये प्रदर्शित झाला. रवींद्र दवे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटानं अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली. एक कोटी रुपये या चित्रपटानं मिळवले. त्या काळात इतकी कमाई भरपूर होती.

१९८१ मधला ‘राज’

यानंतर राज बब्बर आणि सुलक्षणा पंडित यांच्या भूमिका असलेला ‘राज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं नावही ‘राज’ होतं आणि कलाकाराचं नावही राज होतं. हरमेश मल्होत्रा यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपटही सुपरहिट ठरला.
advertisement

२००२ मधला ‘राज’

बिपाशा बासू आणि डिनो मोरिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अत्यंत थरारक आणि भितिदायक होता. विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. पाच कोटी रुपयांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला; मात्र त्याची कमाई ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली. या चित्रपटाची गाणीही खूप गाजली. तसंच बिपाशा बासूला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.
advertisement

२००९ मधला ‘राज - द मिस्ट्री कंटिन्यूज’

‘राज’ या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणून आलेला ‘राज- द मिस्ट्री कंटिन्यूज’ हा चित्रपटही हिट ठरला. त्यात इम्रान हाश्मी, कंगना रनौत आणि अध्ययन सुमन यांनी भूमिका केल्या होत्या. मोहित सूरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाची गाणीही खूप लोकप्रिय झाली. हा चित्रपट १५ कोटी रुपयांमध्ये तयार झाला आणि त्याची कमाई ३८ कोटी रुपये झाली.
advertisement

२०१२ मधला ‘राज 3’

बिपाशा बासू, इम्रान हाश्मी आणि ईशा गुप्ता यांच्या भूमिका असलेला ‘राज 3’ हा चित्रपट पुन्हा एकदा २०१२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. विक्रम भट्ट हेच त्याचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाला तर भरपूर यश मिळालं. २८ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं ६९.७३ कोटी रुपयांची कमाई केली.

२०१६ मधला ‘राज-रिबूट’

advertisement
इम्रान हाश्मी, कृती खरबंदा आणि गौरव अरोरा यांच्या भूमिका असलेला ‘राज-रिबूट’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. विक्रम भट्ट यांनीच त्याचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाला इतर चित्रपटांच्या तुलनेत थोडं कमी यश मिळालं; पण तरीही ३१ कोटी रुपयांमध्ये तयार झालेला चित्रपट ४०.९१ कोटींची कमाई करून गेला.
थोडक्यात, आजवर आलेल्या ‘राज’ या नावाच्या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. त्यामुळे त्यांनी उत्तम कमाई केली.
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकाच नावाने तब्बल 6 वेळा बनवला सिनेमा, 3 मध्ये तर हिरोही सेमच, तरीही केली छप्परफाड कमाई
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement