'या' प्रसिद्ध अभिनेत्यांनी घटस्फोटित महिलांशी थाटला संसार, 4 नंबरचं नाव वाचून व्हाल शॉक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये नाती जशी पडद्यावर रंगतदार असतात, तशीच खरी आयुष्यातही असतात. कुणाचे नाते तुटते, कुणाचे नव्याने जुळते.
मुंबई : बॉलिवूडमध्ये नाती जशी पडद्यावर रंगतदार असतात, तशीच खरी आयुष्यातही असतात. कुणाचे नाते तुटते, कुणाचे नव्याने जुळते. पण या सगळ्यात काही कलाकारांनी समाजात पक्कं उदाहरण ठेवलं की प्रेमाचं खरं सौंदर्य भूतकाळाच्या टॅगमध्ये नसून परस्परांच्या समजुतीत आणि विश्वासात आहे.
असेच काही कलाकार ज्यांनी घटस्फोटित महिलांशी संसार थाटला. हे अभिनेते कोण आहेत? याविषयी जाणून घेऊया.
मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली
‘डिस्को डान्सर’ फेम मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेत्री योगिता बालीशी 1979 मध्ये लग्न केलं. योगिता याआधी गायक किशोर कुमार यांच्या पत्नी होत्या. मात्र, ते नातं टिकले नाही. मिथुन-योगिता मात्र आजही एकत्र आहेत आणि त्यांच्या मुलांनीदेखील अभिनयक्षेत्रात आपली छाप सोडली आहे.
advertisement
विनोद खन्ना आणि कविता खन्ना
विनोद खन्नांचं पहिलं लग्न गीतांजलीशी झालं, पण ते तुटलं. त्यानंतर त्यांनी कविता नावाच्या घटस्फोटित महिलेशी लग्न केलं. कविता आणि विनोद यांचं नातं मात्र शेवटपर्यंत घट्ट राहिलं.
संजय दत्त आणि मान्यता
संजय दत्तचं आयुष्य नेहमीच वादांनी भरलेलं. पण तिसऱ्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आलं. मान्यता पूर्वी विवाहित होती आणि घटस्फोटानंतर संजयच्या आयुष्यात आली. आज या जोडप्याचं आयुष्य खूप आनंदी आहे.
advertisement
राहुल रॉय आणि राजलक्ष्मी
‘आशिकी’ फेम राहुल रॉयने मॉडेल राजलक्ष्मीशी लग्न केलं. राजलक्ष्मी याआधी अभिनेता समीर सोनीची पत्नी होती. जरी हे नातं नंतर टिकले नाही, तरी दोघांनी आपली दुसरी इनिंग सुरू करण्याचं धाडस दाखवलं.
समीर सोनी आणि नीलम कोठारी
समीर सोनीनेही घटस्फोटित नीलमशी लग्न केलं. नीलम याआधी उद्योगपती ऋषी सेठिया यांची पत्नी होती. आज समीर-नीलम यांना बॉलिवूडचं पॉवर कपल म्हटलं जातं.
advertisement
अनुपम खेर आणि किरण खेर
थिएटर जगतातून एकत्र आलेले अनुपम आणि किरण खेर आजही एकमेकांचे पक्के आधार आहेत. किरण यांचं पहिलं लग्न अपयशी ठरलं होतं, पण अनुपमसोबत त्यांना खरी साथ मिळाली.
गुलजार आणि राखी
गुलजार आणि राखीची जोडी त्या काळी चर्चेत होती. राखीचा आधी घटस्फोट झाला होता आणि मग तिनं गुलजारशी लग्न केलं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 3:47 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'या' प्रसिद्ध अभिनेत्यांनी घटस्फोटित महिलांशी थाटला संसार, 4 नंबरचं नाव वाचून व्हाल शॉक