ज्येष्ठ रीलस्टार रामभाऊ साळुंखे यांचं निधन, अचानक जाण्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सोशल मीडियावर आपल्या अभिनयाने आणि वेगळ्या अंदाजाने घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध रिल्सस्टार रामभाऊ गेणू साळुंखे यांचे दुःखद निधन झाले आहे.
मुंबई : सोशल मीडियावर आपल्या अभिनयाने आणि वेगळ्या अंदाजाने घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध रिल्सस्टार रामभाऊ गेणू साळुंखे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने लोकांची मनं जिंकली होती. मात्र त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रामभाऊ साळुंखे हे रिल्सस्टार संदीप साळुंखे यांचे आजोबा होते. विशेष म्हणजे त्यांच्या बहुतेक व्हिडिओंमध्ये संपूर्ण कुटुंबाचाच सहभाग असायचा. कुटुंबासोबतच्या अभिनयामुळे त्यांच्या व्हिडिओंना खूप लोकप्रियता मिळाली. आजोबांची साधी, निरागस आणि खुमासदार भूमिका प्रेक्षकांना नेहमीच भावायची.
पण आता पुढील व्हिडिओंमध्ये रामभाऊ साळुंखे यांचा चेहरा दिसणार नाही, ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. “आजोबांशिवाय रिल्स अपूर्ण वाटतील”, “रामभाऊंच्या साधेपणाची खूप आठवण येईल” अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
View this post on Instagram
advertisement
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:57 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ज्येष्ठ रीलस्टार रामभाऊ साळुंखे यांचं निधन, अचानक जाण्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का