advertisement

Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, छ. संभाजीनगरसह या जिल्ह्यात धो धो कोसळणार, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
1/5
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण घाटमाथ्यासह मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. आज रविवारी देखील ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज आहे. 7 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे याकाळात वातावरण ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाटही होऊ शकतो. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत असू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

3/5
परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या 4 जिल्ह्यांत साधारणतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो. तर उर्वरित बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हलका पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

4/5
मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीपिकांना फटका बसत आहे. काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागेल.

5/5
छत्रपती संभाजीनगरसह जालना परिसरात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. 48 तासांत देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement