Asia Cup आधी स्पॉन्सर गायब, टीम इंडियाची नवी जर्सी समोर, 23 वर्षात असं पहिल्यांदाच झालं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
New Jersey Team India Asia Cup 2025 : टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू शिवम दुबे याने आशिया कपसाठी बीसीसीआयने जारी केलेली नवीन जर्सी घालून फोटोशूट केलं आहे.
Team India New Jersey : आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू नवीन जर्सी घालतील. ड्रीम 11 पासून वेगळे झाल्यानंतर, भारतीय संघाच्या जर्सीवर कोणत्या स्पॉन्सरचा लोगो असेल? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. पण आता आशिया कपमध्ये टीम इंडिया स्पॉन्सरशिवाय खेळणार आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर कोणत्याही स्पॉन्सरचा लोगो नसेल. अशातच आता आशिया कपसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी आली आहे.
ऑनलाइन गेमिंगवर बंदी
आशिया कपपूर्वी, भारत सरकारने एक नवीन कायदा केला आहे ज्यामध्ये त्यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली आहे. यानंतर, बीसीसीआयचा ड्रीम 11 सोबतचा करार मोडला गेला. ड्रीम 11 पूर्वी भारतीय संघाच्या जर्सीचे स्पॉन्सर होते. पण आता भारतीय बोर्डाने त्याच्याशी संबंध तोडले असल्याने टीम इंडियाला मुख्य स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरावं लागेल. तब्बल 23 वर्षानंतर टीम इंडियावर अशी परिस्थिती आली आहे.
advertisement
कशी आहे जर्सी?
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू शिवम दुबे याने आशिया कपसाठी बीसीसीआयने जारी केलेली नवीन जर्सी घालून फोटोशूट केलं आहे. दुबेने सोशल मीडियावर नवीन जर्सीमधील तीन फोटो पोस्ट केले आहेत. आशिया कपमध्ये भारतीय खेळाडू ज्या जर्सी घालतील त्यावर मोठ्या अक्षरात 'INDIA' लिहिलेले आहे. जर्सीच्या डाव्या बाजूला BCCI चा लोगो आणि उजव्या बाजूला आशिया कप 2025 चा लोगो आहे.
advertisement
advertisement
आशिया कपसाठी टीम इंडियाचा स्कॉड
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:39 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup आधी स्पॉन्सर गायब, टीम इंडियाची नवी जर्सी समोर, 23 वर्षात असं पहिल्यांदाच झालं!