advertisement

'हे मम्मी पप्पांना आवडणार नाही', विशालच्या प्रेमात सीरियस झाली रुचिता! माईक काढून सुरू होतं गुलूगुलू, VIDEO

Last Updated:

बिग बॉसच्या घरात सगळ्या स्पर्धकांच्या नकळत विशाल आणि रुचिता यांचं प्रेम सुरू आहे. दोघांचं गुपचूप सुरू असलेलं गुलूगुलू बिग बॉसनेच पकडलं.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या रुचिता आणि विशाल यांच्यात प्रेमाचे वारे वाहत आहेत. आधी रुचिताने विशाल तिला आवडतो, त्याच्या प्रेझेंस तिला आवडतो असं सांगितलं होतं. त्यानंतर टास्कमध्ये विशालने देखील रुचितावरचं प्रेम व्यक्त केलं होतं. मला आवडते ती, आमच्यात वयाचं वगैरे अंतर आहे याचा मला फरक पडत नाही, ते आमचं आम्ही बघून घेऊ असं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर आता हळू हळू विशाल आणि रुचिता एकमेकांच्या जवळ येत आहेत.
बिग बॉसच्या घरात सगळ्या स्पर्धकांच्या नकळत विशाल आणि रुचिता यांचं प्रेम सुरू आहे. दोघांचं गुपचूप सुरू असलेलं गुलूगुलू बिग बॉसनेच पकडलं. कालच्या एपिसोडमध्ये विशाल आणि रुचिता यांना गार्डनर एरियामध्ये प्रेमाच्या गोष्टी बोलताना बिग बॉसने पकडलं.
advertisement
विशाल आणि रुचिता गार्डनर एरियामध्ये फेऱ्या मारत होते. मात्र दोघांनीही माईक घातला नव्हता. बिग बॉसच्या कॅमेरात त्यांचं बोलणं रेकॉर्ड होऊ नये यासाठी त्यांनी माईक काढून ठेवले. बिग बॉसने दोघांना माईक घालण्याची सूचना दिली. तेव्हा रुचिता विशालला म्हणाली, "मला तुला फक्त एवढंच म्हणायचंय की हे मम्मी पप्पांना नाही आवडणार. लेट्स अवॉईड धीस टोटली. मी तुला जेव्हा बोलेन शांत बस, तू नको बोलू. हेच मला तुला समजवायचं आहे. पण ते मला समजवता येत नाही."
advertisement
त्यावर माईक घालून विशाल म्हणाला, "ठीक आहे समजलं". त्यानंतर विशालने तिला इंग्रजीत सांगितलं, की आता काहीही बोलूया नको, इथून पुढे काय बोलायचं आहे ते 80 टक्के इंग्रजीत बोलायचं.



 










View this post on Instagram























 

A post shared by akshu sadar (@akshu_2430)



advertisement
बिग बॉसच्या घरात काहीही बोलायचं असेल तर स्पर्धकांना त्यांच्या गळ्यात माईक हा कम्प्लसरी घालावा लागतो. बिग बॉसच्या महत्त्वाच्या नियमांपैकी हा एक महत्त्वाचा नियम आहे. पण प्रेमात आंधळे झालेल्या विशाल आणि रुचिता यांनी थेट माईक काढूनच बोलायला सुरूवात केली.
विशाल आणि रुचिताच्या लव्ह अँगलवर सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. रुचिता आणि विशाल यांच्यातील वयाचं अंतर खूप असल्याने रुचिताला त्यावरून ट्रोल केलं जातंय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत की हा त्यांचा गेम प्लान आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे मम्मी पप्पांना आवडणार नाही', विशालच्या प्रेमात सीरियस झाली रुचिता! माईक काढून सुरू होतं गुलूगुलू, VIDEO
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement