'तुमची सून आहे, तिला...', लग्नानंतर रश्मिकासाठी विजय बोलला असं काही... लाजून गुलाबी झाली अभिनेत्री, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika-Vijay Reception : २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये पार पडलेल्या शाही विवाहसोहळ्यानंतर, हे पॉवर कपल प्रथमच हैदराबादमध्ये मीडियासमोर आलं.
हैदराबाद : ज्या क्षणाची वाट संपूर्ण भारत देश पाहत होता, तो क्षण अखेर सत्यात उतरला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत. २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये पार पडलेल्या शाही विवाहसोहळ्यानंतर, हे पॉवर कपल प्रथमच हैदराबादमध्ये मीडियासमोर आलं. पण यावेळी विजयने जे काही केलं, त्याने रश्मिकाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचंच काळजाचा ठोका चुकला.
माझी रश्मिका... तुमची लाडकी सून!
हैदराबादमध्ये आयोजित एका भव्य प्रेस मीटमध्ये विजय आणि रश्मिकाने मीडियाचे आभार मानले. पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात विजय अगदी देसी मुंडा दिसत होता, तर गुलाबी साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळी कुंकू नववधूच्या रुपात शोभून दिसत होती. यावेळी बोलताना विजय भावूक झाला.
advertisement
तो म्हणाला, "तुम्ही मला लहानपणापासून पाहिलंय, माझं करिअर घडताना पाहिलंय. आजही जेव्हा मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत आहात. आज तेलगू राज्यांना (आंध्र आणि तेलंगणा) एक नवी सून मिळाली आहे. आता तिची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे!" विजयचं हे वाक्य ऐकताच शेजारी उभी असलेली रश्मिका लाजेने अक्षरशः लालबूंद झाली. तिने हसून विजयकडे पाहिलं आणि हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
advertisement
VIDEO | Hyderabad: Actor Vijay Deverakonda addressing a gathering says, "Thank you all for your wishes. We came here to take all your blessings. While we're here, Telugu states have a new daughter-in-law, so I hope you all will look after her."
(Full video available on PTI… pic.twitter.com/ZFsfRXRysd
— Press Trust of India (@PTI_News) March 4, 2026
advertisement
विजय-रश्मिकाची चाहत्यांसोबत लंच डेट
केवळ मीडियाच नाही, तर आपल्या लाडक्या चाहत्यांसाठीही या जोडीने खास वेळ काढला होता. लग्नानंतरच्या पहिल्या सार्वजनिक भेटीत विजय आणि रश्मिकाने चाहत्यांसोबत एकत्र बसून दुपारचं जेवण केलं. यावेळी एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात रश्मिका स्वतःच्या हाताने विजयला घास भरवताना दिसत आहे. हे पाहून उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला. रश्मिका म्हणाली, "आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं पाऊल उचललं आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे."
advertisement
'गीता गोविंदम' ते 'मिसेस देवरकोंडा' पर्यंतचा प्रवास
२०१८ मध्ये 'गीता गोविंदम'च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती. 'डिअर कॉम्रेड'मध्ये ही जोडी पुन्हा दिसली आणि खऱ्या आयुष्यातही त्यांच्या प्रेमाचे अंकुर फुटले. गेली अनेक वर्ष त्यांनी आपलं नातं गुपित ठेवलं होतं, पण अखेर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी सात फेरे घेतले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 7:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुमची सून आहे, तिला...', लग्नानंतर रश्मिकासाठी विजय बोलला असं काही... लाजून गुलाबी झाली अभिनेत्री, VIDEO








