Feeding Pigeons Explainer: 'कबुतरांना दाणे टाकण्याआधी माझ्या मुलीचा चेहरा आठवा...'; एका पित्याची आर्त विनंती, हृदय पिळवटून टाकणारी पुण्यातील सत्यकथा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pune: पुण्यातील श्याम मानकर ज्यांनी आपली मुलगी शीतलला कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेल्या फुफ्फुसांच्या फायब्रोसिसमुळे गमावले. आता लोकांमध्ये या गंभीर धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करत आहेत. कबुतरांना दाणे टाकण्याच्या सवयीमुळे कसे जीवघेणे आजार होऊ शकतात, याची ही दुर्दैवी कहाणी आहे.
मुंबईत कबुतरखान्यावरून मागील काही दिवसात चांगलाच वाद पेटला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर ही कबुतरांना खाणे दिले जात आहे. गेल्या आठवड्यात कबुतरखान्यावर लावलेल्या ताडपत्रीमुळे लोक संतप्त झाले आणि त्यांनी ताडपत्री फाडून काढत आंदोलन केले होते. त्यानंतर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कबुतरखान्यावरील बंदी कायम राहिली. यामुळे जैन समुदायाने आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका अशा बापाची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी कबुतरांच्या विष्ठेने स्वत:च्या लेकीला गमावले आणि आता ते जनजागृतीचे काम करत आहेत.
पुण्यातील शीतल विजय शिंदे या 19 जानेवारी रोजी रुग्णालयातून घरी परत येणार होत्या. मात्र त्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली आणि एक दुःखी कुटुंब आहे. शीतल यांचे वडील आणि पुण्याचे माजी नगरसेवक श्याम मानकर आता त्यांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण म्हणजेच कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या फुफ्फुसांच्या फायब्रोसिसबद्दल जनजागृती करण्याचे काम करत आहेत.
advertisement
कबुतरांमुळे लागला आजार
2017 पासून शीतलची तब्येत बिघडायला लागली. तिला सतत खोकला येत होता. आम्ही स्थानिक डॉक्टर आणि आयुर्वेदिक वैद्यांनाही दाखवले. पण खोकला थांबत नव्हता. त्यानंतर आम्ही कॅम्पमधील एका डॉक्टरांना भेटलो. त्यांनी विचारले, तुम्ही जिथे राहता तिथे कबुतरे आहेत का? आणि ते खरे ठरले. शीतलच्या घराच्या वरच्या मजल्यावर लोक कबुतरांना दाणे टाकत होते. त्यामुळे तिथे कबुतरांनी घरटे केले होते. डॉक्टर म्हणाले की, याच कबुतरांमुळे तिला खोकला होत आहे.
advertisement
या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाचा डॉक्टरांकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. त्यांनी पुण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये आणि मुंबईतील लीलावती रुग्णालयातही उपचार घेतले. दोन-तीन महिन्यांच्या तपासणीनंतर सर्व ठिकाणी एकच निदान झाले. काही वर्षांतच शीतलची तब्येत खूप खालावली. तिला चालण्यात त्रास होऊ लागला आणि श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. रात्री तिला झोप लागत नव्हती. अखेरीस तिला ऑक्सिजनची गरज भासू लागली. बाहेर जाताना ती सोबत एक लहान ऑक्सिजन बॉक्स घेऊन जात असे. एका वर्षानंतर तिला 24 तास ऑक्सिजनवर राहावे लागले. रात्री झोपण्यासाठी ती प्रयत्न करायची, पण फक्त खोकल्याने तिचा त्रास वाढत होता.
advertisement
फुफ्फुस प्रत्यारोपण शक्य झाले नाही
पुण्यातील डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये शीतलचे नाव फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या उमेदवारांमध्ये समाविष्ट करण्यात आले. आम्हाला दोन वेळा फुफ्फुस मिळाले. पहिल्या वेळी ते मॅच झाले नाही. दुसऱ्या वेळी डॉक्टरांनी सांगितले की, फुफ्फुस खराब झाले आहे आणि ते शीतलसाठी वापरता येणार नाही, असे मानकर सांगतात.
मी लवकरच घरी परत येईन
19 जानेवारी रोजी शीतल पाठीच्या दुखण्यामुळे रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी तिला व्यायाम करण्यास सांगितल्यामुळे तिने घरीच एक जिम बनवली होती. ती म्हणाली होती- मी लवकरच घरी परत येईन, असे मानकर आठवणीत सांगतात.
advertisement
जागरूकता पसरवण्याचा निर्धार
शीतलच्या मृत्यूनंतर मानकर यांनी कबुतरांच्या आरोग्याच्या धोक्यांबद्दल माहिती मिळवली आणि आता ते लोकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार करत आहेत. कबुतरांची विष्ठा दोन-तीन दिवसांनी वाळून तिची पूड होते, जी हवेत मिसळते. ही हवा घरात येते आणि आपल्याला संक्रमित करते. एकदा व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की, लक्षणे दिसू लागतात आणि हे अनेक वर्षांनंतरही होऊ शकते, असे ते म्हणाले.
advertisement
शीतल आणि तिच्या कुटुंबाने दोनदा घर बदलले होते, पण संसर्ग झाला होता. कबुतरं मानवी वस्त्यांच्या आधीपासूनच निसर्गाचा भाग आहेत. ती स्वतःहून अन्न शोधू शकतात. कबुतरांना दाणे टाकण्याच्या सवयीमुळे त्यांच्या नैसर्गिक क्षमतेत हस्तक्षेप होत आहे. गर्दीच्या शहरी भागांमध्ये कबुतरांची वाढती संख्या आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे, असे मानकर सांगतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 12, 2025 9:56 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Feeding Pigeons Explainer: 'कबुतरांना दाणे टाकण्याआधी माझ्या मुलीचा चेहरा आठवा...'; एका पित्याची आर्त विनंती, हृदय पिळवटून टाकणारी पुण्यातील सत्यकथा


