Explainer: Black Hole चा मृत्यू कसा होतो? जगाचाच नाश झाला तर...

Last Updated:

आपल्या डोक्यावरच्या अवकाशामध्ये अनेक गुपितं दडलेली आहेत. अंतराळ संशोधक अवकाशातली ही गुपितं शोधून काढण्याचं काम करत असतात

News18
News18
आपल्या डोक्यावरच्या अवकाशामध्ये अनेक गुपितं दडलेली आहेत. अंतराळ संशोधक अवकाशातली ही गुपितं शोधून काढण्याचं काम करत असतात. अशा गुपितांमध्ये ब्लॅक होलचादेखील समावेश होतो. ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवर ही संकल्पना साधरण शंभर वर्षांपूर्वी समोर आली. तेव्हापासून त्याबाबत सातत्याने संशोधन सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, शास्त्रज्ञांनी अतिशय प्राचीन सुपरमॅसिव्ह कृष्णविवरांचा शोध लावला आहे. ही कृष्णविवरं महाविस्फोटाच्या (बिग बँग) काही काळानंतर विश्वाच्या सुरुवातीच्या काळात अस्तित्वात आली. या कृष्णविवरांचा नाश होण्यास बराच वेळ लागतो, हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. या कृष्णविवरांचा अतिशय संथ आणि सामान्य पद्धतीने मृत्यू होऊ शकतो.
सूर्याएवढं वस्तुमान असलेलं कृष्णविवर नष्ट होण्यासाठी 10^64 वर्षं लागू शकतात. आपल्या विश्वाचं वय 10^10 वर्षे आहे. म्हणजेच सैद्धांतिकदृष्ट्या ब्रह्मांड संपल्यानंतरही कृष्णविवर टिकून राहणं शक्य आहे.
कृष्णविवरामधली रिकामी जागा खरोखर रिकामी नसते. त्याला वस्तुमान किंवा ऊर्जा नसली तरीही वस्तुमान आणि ऊर्जा दर्शवणारं 'क्वांटम फिल्ड' तिथे अस्तित्वात असतं. या फिल्डला शून्य ऊर्जेची गरज नसल्यामुळे 'आभासी कणांच्या' जोड्या तयार करू शकतात. सामान्यत: पार्टिकल-अँटीपार्टिकल अशी जोडी तयार होते. हे दोन्ही एकमेकांचा त्वरित नाश करतात; पण या जोडीतला एक पार्टिकल कृष्णविवराच्या आत जाण्याची शक्यता असते, तर दुसरा 'हॉकिंग रेडिएशन'च्या रूपात बाहेर पडतो.
advertisement
कृष्णविवराची एकूण ऊर्जा वाचवण्यासाठी, त्यात पडणाऱ्या पार्टिकलमध्ये 'नकारात्मक ऊर्जा' (नकारात्मक वस्तुमान) आणि बाहेर पडणाऱ्या पार्टिकलमध्ये सकारात्मक ऊर्जा असणं गरजेचं असतं. हॉकिंग रेडिएशन हा गुरुत्वाकर्षणाचा स्पेस-टाइमवर होणाऱ्या परिणामाचं फलित आहे. रिकाम्या जागेतलं 'क्वांटम फिल्ड' हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचं पालन करतं. म्हणजेच, आपण त्यांची ऊर्जा जाणून घेऊ शकतो.
गुरुत्वाकर्षण क्षेत्र स्पेस-टाइम वळवतं आणि वेळेच्या स्थानिक प्रवाहावर परिणाम करतं. याचा अर्थ असा होतो, की भिन्न गुरुत्वाकर्षण वक्रता असलेलं स्पेस-टाइमचं क्षेत्र क्वांटम फिल्डच्या ऊर्जेवर एकरूप होऊ शकत नाही. कृष्णविवरातल्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी व्हॅक्युमच्या (निर्वात) ऊर्जेतल्या फरकामुळे तथाकथित 'आभासी कण' तयार होतात.
advertisement
कृष्णविवरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा हळूहळू त्याचं वस्तुमान आणि ऊर्जा कमी करते. त्यामुळे त्यांना नवीन सामग्री सक्रियपणे शोषून घेता येत नाही. अशा प्रकारे कृष्णविवरं हळूहळू आक्रसत जातील आणि शेवटी अदृश्य होतील; मात्र हे होण्यासाठी बराच वेळ लागेल.
मराठी बातम्या/Explainer/
Explainer: Black Hole चा मृत्यू कसा होतो? जगाचाच नाश झाला तर...
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement