रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्यास किती नुकसान भरपाई मिळते? नियम काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Mumbai News : शहराच्या जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवासी ट्रॅकवर पडल्यामुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : शहराच्या जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवासी ट्रॅकवर पडल्यामुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मुंब्रा स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडली. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे याचा परिणाम थेट प्रवाशांच्या सुरक्षेवर झाला.
ही घटना घडताच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा अपघातांनंतर प्रश्न उपस्थित होतो की, अशा दुर्घटनांमध्ये मृत पावलेल्या किंवा गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना नुकसानभरपाई मिळते का? मिळते,तर किती आणि कोणत्या अटींसह मिळते? हेच आपण जाणून घेणार आहोत.
कोणत्या परिस्थितीत नुकसानभरपाई दिली जाते?
भारतीय रेल्वे कायद्यानुसार, ट्रेनशी संबंधित अपघातात जर प्रवाशाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळू शकते. मात्र,यामध्ये काही महत्त्वाच्या अटी असतात.
advertisement
दुर्घटनाग्रस्त स्थिती - प्रवासी जर ट्रेनमधून प्रवास करत असताना चुकून खाली पडला, चेंगराचेंगरी झाली.किंवा रेल्वे अपघात झाला आणि यात रेल्वेची चूक असल्याचं आढळलं तर नुकसानभरपाई दिली जाते.
स्वतःहून उडी मारल्यास अपात्र - जर एखाद्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा निष्काळजीपणामुळे स्वतःहून ट्रेनखाली गेला तर अशा परिस्थितीत नुकसानभरपाई मिळत नाही.
आरोग्याशी संबंधित मृत्यू - प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाचा आजारपणामुळे मृत्यू झाला, तर देखील कोणतीही भरपाई दिली जात नाही.
advertisement
विमा संरक्षणाचा पर्याय
IRCTC (भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) आपल्या प्रवाशांसाठी अत्यंत कमी दरात विमा संरक्षण उपलब्ध करून देते.IRCTC वेबसाइट किंवा अॅपवरून तिकीट बुक करताना फक्त 0.35 रुपये म्हणजेच 35 पैशांमध्ये हा विमा घेता येतो.
या विम्यात किती मदत मिळते?
अपघातामुळे मृत्यू झाल्यास – 10 लाख रुपये मदत
कायमस्वरूपी अपंगत्व – 10 लाख रुपये मदत
advertisement
आंशिक अपंगत्व – 7.5 लाख रूपये मदत
गंभीर दुखापतीसाठी रुग्णालय खर्च – 2 लाख रुपये मदत
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 09, 2025 11:38 AM IST