मुंबईतून विमान थेट कराचीला उतरलं, एक व्हॅन आली अन् गोळीबार सुरू, तिने तरीही प्रवाशांना वाचवलं!

Last Updated:

विमानातील सीटखाली लपलेल्या काही मुलांवर पडली. त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सर्वात प्रथम सीटखाली लपलेल्या मुलांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढले.

(नीरजा भानोत)
(नीरजा भानोत)
मुंबई: मुंबई विमानतळावरून पॅन एएम एअरलाइन्सची फ्लाइट-73 हे विमान टेकऑफ झाल्यानंतर सकाळी 6 वाजता कराची विमानतळावर उतरलं होते. मात्र, येथेच ते हायजॅक झाले. यावेळी नीरजा भानोत या युवतीनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हायजॅक झालेल्या विमानातील प्रवाशांचा जीव वाचवला होता. तो दिवस होता 5 सप्टेंबर 1986. या घटनेला आता जवळपास 38 वर्षं पूर्ण झाली आहे. पण या घटनेनंतर नीरजा यांचे नाव अजरामर झाले.
फ्लाइट 73 हे कराची विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथे प्रवासी विमानातून उतरत असतानाच विमानाजवळ एक सुरक्षा व्हॅन आली. या व्हॅनमध्ये सुरक्षा दलाच्या पोशाखात काहीजण होते. ते व्हॅनमधून खाली उतरताच त्यांनी हातामध्ये असणाऱ्या रायफलमधून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यावेळी एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी विमानाचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच काही दहशतवादी विमानात घुसले.
advertisement
पॅलेस्टाइन दहशतवाद्यांनी विमान केले होते हायजॅक
फ्लाइट 73 हायजॅक करणारे दहशतवादी हे पॅलेस्टाइन येथील होते. हे सर्व दहशतवादी असॉल्ट रायफल्स, पिस्तूल, ग्रेनेड आणि स्फोटक बेल्ट यांसारख्या शस्त्रांनी सज्ज होते. दहशतवादी विमानाच्या कॉकपिटपर्यंत पोहोचण्याआधीच विमानातील क्रू हेड नीरजा भानोत यांनी पायलटला हायजॅकचा मेसेज दिला होता. मेसेज मिळताच पायलट ओव्हरहेड इमर्जन्सी हॅचमधून विमानाच्या बाहेर आले. हा एकप्रकारे दहशतवाद्यांचा पराभव होता.
advertisement
नीरजा यांनी उघडला आपत्कालीन दरवाजा
पायलट विमानातून खाली उतरल्यामुळे दहशतवाद्यांनी कराची एअरपोर्ट प्रशासनाकडे लवकरात लवकर पायलट पाठवण्याची मागणी केली. पण ही मागणी पूर्ण होत नसल्यानं अखेर दहशतवाद्यांनी प्रवाशांना मारण्यास सुरुवात केली. याचवेळी अचानक विमानातील सर्व लाइट बंद होऊन केवळ आपत्कालीन लाइट सुरू झाले. हा पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीचा डाव आहे, अस दहशतवाद्यांना वाटले, आणि त्यांनी प्रवाशांच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी प्रवाशांच्या अंगावर ग्रेनेड फेकण्यास सुरुवात केली. याचवेळी नीरजा यांनी प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला.
advertisement
नीरजा यांनी आईसाठी दिला अखरेचा मेसेज
आपत्कालीन दरवाज्यातून सर्व प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर नीरजा देखील त्या दरवाज्यातून बाहेर जाण्यासाठी निघाल्या. पण तेवढ्यात त्यांची नजर विमानातील सीटखाली लपलेल्या काही मुलांवर पडली. त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सर्वात प्रथम सीटखाली लपलेल्या मुलांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढले. पण मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्या शहीद झाल्या. अखेरचा श्वास घेण्यापूर्वी नीरजा यांनी एका मुलामार्फत स्वतःच्या आईला शेवटचा मेसेज दिला होता. जेव्हा त्या मुलाने तो निरोप नीरजा यांच्या आईला सांगितला, तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्यांना स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत. नीरजा यांनी दिलेला शेवटचा तो निरोप होता... ‘पुष्पा! आय हेट टियर्स…’
advertisement
विमान हायजॅक होण्याची ही घटना 38 वर्षांपूर्वीची असली तरी आजही नीरजा यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे त्या अजरामर झाल्या आहेत.
मराठी बातम्या/Explainer/
मुंबईतून विमान थेट कराचीला उतरलं, एक व्हॅन आली अन् गोळीबार सुरू, तिने तरीही प्रवाशांना वाचवलं!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement