काश्मीरमध्ये शत्रू कोण? 28 दिवसांनी समोर आली भयानक Update, दिल्लीत खळबळ; संपूर्ण देशभर अलर्ट जारी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
New Threat In Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर एक नवे आव्हान समोर आले आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी भारतीय जवानांसारखा पोशाख घातला होता.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी भारतीय सुरक्षा दलांच्या वेशात हल्ले करत असल्याने नवी चिंता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे दिल्लीतही खळबळ उडाली आहे. किमान तीन दहशतवादी घटनांमध्ये दहशतवादी भारतीय सुरक्षा दलांच्या गणवेशात दिसले आहेत. ज्यामुळे सामान्य नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी दोघांनाही धोका ओळखणे कठीण झाले आहे.
पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'
यातील सर्वात भीषण हल्ला 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झाला होता. या हल्ल्यात 'द रेजिस्टेंस फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी बैसरन दरीतील पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यावेळीही दहशतवादी भारतीय लष्कराच्या जवानांसारख्याच गणवेशात होते. भारतीय सुरक्षा दलांच्या गणवेशातील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा बळी घेतला. ज्यात एक नेपाळी नागरिकही होता. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
advertisement
सिंधू बंद होताच चीनच्या मेंदूत गोंधळ, पाकिस्तानला मदतीच्या नादात बुद्धी हरवली!
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तात्काळ 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतरची ही सर्वात आक्रमक लष्करी कारवाई मानली जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले काही दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्ये लपलेले असू शकतात.
advertisement
त्रालमध्येही तोच पॅटर्न
पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारांचा शोध सुरू असतानाच त्रालमध्ये अलीकडेच झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले. त्यांची ओळख आसिफ अहमद शेख, आमिर नझीर वानी आणि यावर अहमद भट अशी पटली. या चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून मिळालेले कपडे केवळ धक्कादायक नाहीत, तर विचार करायला लावणारे आहेत. हे तिन्ही दहशतवादी भारतीय लष्कराच्या गणवेशासारखे कपडे परिधान केलेले होते. त्यांच्या कपड्यांची विशेषतः त्यांच्या जॅकेट आणि उपकरणांची आता बारकाईने तपासणी केली जात आहे.
advertisement
10 मे रोजीचा घुसखोरीचा प्रयत्न
10 मे रोजी भारत 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानशी दोन हात करत असताना, जम्मूतील नगोटरा लष्करी तळावर तैनात असलेल्या एका सतर्क जवानाने घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. घुसखोराने संभाव्यतः लष्करी गणवेश परिधान केला होता आणि तो सुरक्षा वेढा तोडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु गोळीबारात त्याला माघार घ्यावी लागली. संशयिताचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने सांगितले की, जवानांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ कारवाईमुळे एक मोठा घातपात टळला.
advertisement
दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
दहशतवादी ज्या प्रकारे सुरक्षा दलांच्या गणवेशासारखे कपडे परिधान करत आहेत, ही एक मोठी सुरक्षा चिंता बनली आहे. यामुळे धोकादायक संभ्रम निर्माण होऊ शकतो. विशेषतः वेगाने चालणाऱ्या ऑपरेशन्स दरम्यान किंवा सामान्य लोकांना मित्र आणि शत्रू यांच्यात फरक ओळखायचा असताना, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "ही रणनीती केवळ धोकादायकच नाही, तर अत्यंत भ्रामक आहे. सामान्य लोक आणि गणवेशधारी सुरक्षा दलांमधील विश्वास कमी करण्याचा हा सरळ प्रयत्न आहे."
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणावर चर्चा करण्यात आली. ज्यात भारताचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणा आता या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' (SOP) चा आढावा घेत आहेत. विशेषतः चौक्यांवर आणि पर्यटन क्षेत्रांमध्ये याबाबात अधिक काळजी घेतली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
काश्मीरमध्ये शत्रू कोण? 28 दिवसांनी समोर आली भयानक Update, दिल्लीत खळबळ; संपूर्ण देशभर अलर्ट जारी