China News: सिंधू बंद होताच चीनच्या मेंदूत गोंधळ, पाकिस्तानला मदतीच्या नादात बुद्धी हरवली!

Last Updated:

China News: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान अडचणीत आले आहे. अशा स्थितीत चीनने पाकिस्तानमधील महत्त्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ होण्याची शक्यता आहे.

News18
News18
इस्लामाबाद/बीजिंग: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 चा सिंधू जल करार (Indus Waters Treaty - IWT) स्थगित केला. यामुळे पाकिस्तानच्या कृषी आणि औद्योगिक क्षेत्र अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर चीनने पाकिस्तानमधील एका महत्त्वाकांक्षी धरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी मालकीची चायना एनर्जी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन 2019 पासून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील (उत्तर-पश्चिम पाकिस्तान) मोहमंद जलविद्युत प्रकल्पावर काम करत आहे. आता हे काम अधिक वेगाने पूर्ण केले जाईल. हा प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होणे अपेक्षित आहे.
हाँगकाँगस्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सरकारी वृत्तवाहिनी CCTV ने गेल्या आठवड्यात धरणाच्या काँक्रीट भरण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे सांगितले. या घटनेला पाकिस्तानच्या या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या जलद विकासातील एक महत्त्वपूर्ण बांधकाम टप्पा असे संबोधले आहे. अधिकृतपणे सप्टेंबर 2019 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम पुढील वर्षी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
advertisement
उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्या चीन भेटीपूर्वी हे घडले आहे. डार आज (सोमवारी) बीजिंगमध्ये चीनचे उच्च Diplomat वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
खैबर पख्तुनख्वामधील मोहमंद धरण एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. यातून वीज निर्मिती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि पूर नियंत्रण साधले जाणार आहे. कार्यान्वित झाल्यावर यातून 800 मेगावॅट वीज तयार होईल आणि प्रांताची राजधानी पेशावरला दररोज 300 दशलक्ष गॅलन पाणी पुरवले जाईल.
advertisement
सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्याचे अधिकार आहेत. तर भारत रावी, सतलज आणि बियास नद्यांच्या पाण्याचा वापर करू शकतो.
भारताने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल समझौता स्थगित करण्याची घोषणा केली. यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे. या नद्यांमधील पाणी पाकिस्तानच्या सुमारे 80 टक्के पिण्याच्या आणि सिंचनाच्या गरजा पूर्ण करते. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांतच भारताने पाकिस्तानला सिंधू जल करार त्वरित प्रभावाने स्थगित करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. पाकिस्तानने कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप भारताने केला आहे.
मराठी बातम्या/विदेश/
China News: सिंधू बंद होताच चीनच्या मेंदूत गोंधळ, पाकिस्तानला मदतीच्या नादात बुद्धी हरवली!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement