औरंगजेबाचे काय घेऊन बसलाय; इतिहासातील विस्मयकारक घटना, शक्तिशाली मुघल सम्राटाची कबर खोदली अन् भारताबाहेर नेले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरू आहे. ही कबर हटवण्याची मागणी करणारी याचिका देखील करण्यात आली आहे. मात्र ज्या मुघल सम्राटाने भारतात या शक्तिशाली घराण्याचा पाया रचला त्याची कबर मृत्यूनंतर 9 वर्षांनी भारताबाहेर नेण्यात आली.
महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे भारतीय पुरातत्व विभागाने ती कबर झाकून टाकली आहे. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणीही झाली आहे. यावरून नागपूरमध्ये हिंसाचार देखील झाला. औरंगजेबची कबरी बाबत काय करायचे याबाबतचा निर्णय होईल तेव्हा होईल. मात्र इतिहासात मुघल सत्तेतील एका शक्तिशाली सम्राटाची कबर त्याच्या मृत्यूनंतर नऊ वर्षांनी भारतातून हटवण्यात आली होती. संबंधित सम्राटाची कबर आता भारताबाहेर आहे. आता त्याचा कोणताही मागमूस भारतात नाही. नेमका काय झाले होते तेव्हा? जाणून घ्या संपूर्ण इतिहास...
भारतात एकूण 20 मुघल बादशाह होऊन गेले. ज्यांनी 1526 ते 1857 या काळात राज्य केले. या मुघल सत्तेची सुरुवात बाबरपासून झाली आणि खऱ्या अर्थाने ती औरंगजेबापर्यंत चालली. त्यानंतर या वंशातील 13 बादशाह झाले. पण ते फारच कमकूवत आणि शक्तीहीन असल्यामुळे त्यांना कोणी ओळखत नाही. सर्वात शक्तिशाली मुघल बादशहांमध्ये एक असाही बादशाह होता, ज्याची कबर त्याच्या मृत्यूनंतर ९ वर्षांनी उखडली गेली. आता त्याची कबर भारतात कुठेच नाही.
advertisement
हिटलरवर कुठे झाले अंत्यसंस्कार? आज तिथे काय आहे? उत्तर कल्पनेच्या पलीकडचे!
हा मुघल बादशाह दुसरा कोणी नसून तोच होता, ज्याने भारतात या शक्तिशाली घराण्याचा पाया रचला. हा शासक बाबर होता. त्याचा जन्म उझबेकिस्तानमध्ये झाला. बाबरचा मृत्यू 26 डिसेंबर 1530 रोजी आग्रा येथे झाला. प्रथम त्याला फिरोजाबाद येथे दफन करण्यात आले.
advertisement
9 वर्षांनी कबर का उखडली?
बाबरची कबर नऊ वर्षांनी का उखडली गेली? हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर बाबरने त्याच्या हयातीत त्याला काबूलमध्ये दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. काबूलचे त्याच्यासाठी विशेष महत्त्व होते. कारण त्याने १५०४ ते १५२६ पर्यंत तेथे राज्य केले होते. त्याने त्याला आपला आधार बनवला होता. त्याने भारताला जिंकलेला प्रदेश मानला. पण त्याची मुळे मध्य आशियात (फरगाणा आणि काबूल) असल्याचे तो मानत होता.
advertisement
तेव्हा त्याला आग्रा येथे दफन केले
जेव्हा बाबरचा मृत्यू आग्रा येथे झाला. तेव्हा त्याला तात्पुरते एका बागेत (शायद चारबाग) दफन करण्यात आले. हे दफन तात्पुरते होते, कारण मुघल परंपरेत मृतदेह लवकर दफन करण्याची प्रथा होती. त्याची अंतिम इच्छा पूर्ण होईल की नाही, हे तेव्हा स्पष्ट नव्हते.
advertisement
9 वर्षांनी कबर तोडली
बाबरची कबर नऊ वर्षांनी आग्रा येथून काढून काबूलला नेण्यामागे अनेक व्यावहारिक आणि ऐतिहासिक कारणे होती. बाबरच्या मृत्यूनंतर हुमायूंला गादी मिळाली. पण त्याचे राज्य सुरुवातीपासूनच अडचणींचे आणि आव्हानात्मक होते. 1530 मध्ये जेव्हा बाबरचा मृत्यू झाला, तेव्हा हुमायूं फक्त 22 वर्षांचा होता. त्याला साम्राज्य स्थिर करण्यात अडचणी येत होत्या. त्याला गुजरातचा बहादूर शाह आणि अफगाण सरदार शेरशाह सूरी यांसारख्या शत्रूंचा सामना करावा लागत होता. 1540 मध्ये शेरशाहने हुमायूंला हरवून भारताबाहेर काढले. त्यामुळे बाबरची कबर काबूलला नेणे शक्य नव्हते.
advertisement
त्यावेळी आग्रा येथून काबूलपर्यंत मृतदेह (किंवा अवशेष) नेणे ही एक लांब आणि धोकादायक प्रक्रिया होती. त्यात शेकडो मैलांचा प्रवास, सुरक्षा व्यवस्था आणि योग्य सन्मानाने वाहतूक करणे आवश्यक होते. हे काम १५३९-४० मध्ये सुरू झाले, जेव्हा हुमायूंने काबूलवर पुन्हा नियंत्रण मिळवले.
advertisement
इतका उशीर का झाला?
काही इतिहासकारांचे मत आहे की बाबरची पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी (जसे की त्याची बहीण खानजादा बेगम) बाबरच्या इच्छेनुसार त्याचे अवशेष काबूलमध्ये नेऊन दफन करावेत असा आग्रह धरला. हुमायूंच्या व्यस्ततेमुळे हे काम उशिरा झाले.
हुमायूंने आपल्या वडिलांच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी हे पाऊल उचलले असावे. जेव्हा त्याला वाटले की तो काबूलमध्ये बाबरची कबर कायमस्वरूपी स्थापित करू शकतो. बाबरची कबर आजही काबूलमधील बाग-ए-बाबरमध्ये आहे. जिथे त्याच्या सभोवताली एक सुंदर बाग आहे. हे अफगाणिस्तानातील मुघल इतिहासाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.
इतर मुघल बादशहांच्या कबरी कुठे आहेत?
हुमायूंची कबर दिल्लीत
अकबराची कबर सिकंदरा
जहांगीरची कबर लाहोरमध्ये
शाहजहाँची कबर ताजमहालमध्ये
औरंगजेबाची मजार खुलताबाद येथे
बहादुरशाह जफरची मजार रंगून येथे
इतर मुघल बादशहांच्या कबरी तितक्या प्रसिद्ध नाहीत. आणि त्या लहान मकबऱ्या किंवा मजारपुरत्या मर्यादित आहेत. ज्यांचा उल्लेखही होत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 22, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
औरंगजेबाचे काय घेऊन बसलाय; इतिहासातील विस्मयकारक घटना, शक्तिशाली मुघल सम्राटाची कबर खोदली अन् भारताबाहेर नेले