vietnam: 50 लाख लोकांची हत्या, 58 हजार अमेरिकन सैनिकांचा मृत्यू, पण तरीही 40 पट श्रीमंत आहे देश
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
एकदम उद्ध्वस्त होऊन पुन्हा उभारी मिळवणारा हा देश संपूर्ण जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे. व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
दिल्ली: आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी विमनस्क स्थिती व्हिएतनाम या देशाने अनुभवलेली आहे. एकदम उद्ध्वस्त होऊन पुन्हा उभारी मिळवणारा हा देश संपूर्ण जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे. व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. व्हिएतनामचे पंतप्रधान मंगळवारी (30 जुलै) रात्री दिल्लीत आले आहेत.
व्हिएतनाम हा पूर्व आशियातला एक महत्त्वाचा देश आहे. व्हिएतनाम आणि भारताच्या संबंधांचा इतिहास खूप जुना आहे; पण आधुनिक युगात शीतयुद्धाच्या काळात हा देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. अमेरिका आणि रशिया यांच्यातलं प्रॉक्सी युद्ध याच देशाच्या भूमीवर झालं. 1955 ते 1973 पर्यंत जवळपास दोन दशकं चाललेल्या या युद्धात व्हिएतनामचा संपूर्णपणे नाश झाला होता.
advertisement
या युद्धात सुमारे पाच दशलक्ष व्हिएतनामी नागरिक मारले गेले. अमेरिकेला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. व्हिएतनामच्या भूमीवर अमेरिकेचे सुमारे 58 हजार सैनिक मारले गेले. व्हिएतनाम युद्ध हे मुळात उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाममधलं युद्ध होतं. चीन आणि रशिया उत्तर व्हिएतनामच्या पाठीशी होते, तर अमेरिकेने दक्षिण व्हिएतनामला पाठिंबा दिला होता. हे जगाच्या इतिहासातलं सर्वांत भीषण युद्ध होतं.
advertisement
भविष्याचा प्रवास
या विध्वंसानंतर व्हिएतनामने 1980 च्या दशकात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हा देश पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिला. भविष्यात आपण कोणत्याही जागतिक गटाचा भाग होणार नाही, अशी खूणगाठ या देशाने बांधली. आपल्या नागरिकांच्या भल्याचा विचार करून पुढे जाण्याचा विचार तत्कालीन नेत्यांनी मांडला. वसाहतवादी शक्तींपासून स्वातंत्र्य आणि लोकांमध्ये एकता प्रस्थापित करण्याची दोन उद्दिष्टं समोर ठेवून या देशाने आपला प्रवास सुरू केला. या धोरणाला अनुसरून या देशाने अमेरिका, चीन आणि रशियाशी आपले संबंध सुधारले आहेत.
advertisement
आर्थिक प्रगती
आपला रक्तरंजित इतिहास विसरून व्हिएतनाम पुढे जात आहे. 1986मध्ये तिथे आर्थिक सुधारणांचं धोरण (डोई मोई) लागू केलं गेलं. या आर्थिक सुधारणांमुळे आज या देशाचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे. 1986 च्या सुमारास, व्हिएतनामचं दरडोई उत्पन्न फक्त 100 डॉलर होतं. सध्या ते 4300 डॉलर प्रति व्यक्ती एवढं आहे. हा आकडा भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे. म्हणजेच या देशाने 40 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 40 पटींनी प्रगती केली आहे. तिथल्या गरिबीचं प्रमाण फक्त तीन टक्के आहे. व्हिएतनामची जगातल्या सर्वांत मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये गणना केली जाते.
advertisement
2001मध्ये या देशाची निर्यात फक्त दोन अब्ज डॉलर्सची होती; पण सध्या तिथली निर्यात 375 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. 2023मध्ये भारताची एकूण निर्यात 778 अब्ज डॉलर्स होती. व्हिएतनाम एकट्या चीनसोबत 175 अब्ज डॉलर्सचा व्यापार करत आहे.

व्हियतनामाचे पंतप्रधान भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर
advertisement
भारत आणि व्हिएतनाममधले संबंध गेल्या काही दशकांमध्ये लक्षणीयरीत्या सुधारले आहेत. दोन्ही देशांना मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत परस्पर व्यापार पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवायचा आहे. भारत व्हिएतनामकडे महत्त्वाचा सामरिक भागीदार म्हणून बघत आहे. गेल्या वर्षी भारताने आपल्या नेव्हीमध्ये कार्यरत असलेली आयएनएस किरपान ही युद्धनौका व्हिएतनामला भेट दिली आहे. यासोबतच भारताचं अत्याधुनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचीही व्हिएतनामची इच्छा आहे.
advertisement
भारत आणि व्हिएतनाममधल्या भागीदारीचा पाया 2007मध्ये घातला गेला. पीएम मोदींनी त्याला नवीन उंचीवर नेण्याचं काम केलं. 2016 मध्ये त्यांनी व्हिएतनामला भेट दिली होती. त्यानंतर 2022 मध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हनोईला भेट दिली होती. आता व्हिएतनामचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत.
चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिएतनाम उपयुक्त
दक्षिण चीन समुद्रात चीनचा प्रभाव रोखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक अडथळामुक्त ठेवण्यासाठी व्हिएतनामची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा स्थितीत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिएतनामची भूमिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Location :
Delhi
First Published :
August 01, 2024 9:29 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
vietnam: 50 लाख लोकांची हत्या, 58 हजार अमेरिकन सैनिकांचा मृत्यू, पण तरीही 40 पट श्रीमंत आहे देश