महाराष्ट्रात वक्फ बोर्डाकडे किती मालमत्ता? डोळे विस्फारतील; कोणी दान केली? सर्वाधिक जागा कोणत्या जिल्ह्यात!

Last Updated:

Waqf Board Properties in Maharashtra: देशातील सर्वाधिक श्रीमंत वक्फ बोर्ड तेलंगणाचे वक्फ मंडळ आहे. तर मालमत्तेच्या संख्येनुसार उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाकडे किती मालमत्ता आहे? आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक संपत्ती आहे जाणून घ्या...

News18
News18
मुंबई: केंद्र सरकारने नुकतेच वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा करणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले. आता यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल आणि नवा कायदा अस्तित्वात येईल. दरम्यान या कायद्यातील दुरुस्ती घटना विरोधी असल्याचे सांगत अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात वक्फची मालमता असून त्याचे योग्य नियंत्रण होत नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे आणि त्यासाठीच नवा कायदा आणला आहे. देशातील वक्फच्या मालकीच्या एकूण मालमत्तेचा विचार केला तर ती सुमारे 8 लाख 72 हजार (8,72,000) नोंदणीकृत स्थावर मालमत्ता आहेत. विविध अहवालांनुसार वक्फ बोर्डाच्या मालकीची एकूण जमीन 9 लाख 40 हजार एकरांपेक्षा (9,40,000 एकर) अधिक असण्याचा अंदाज आहे. ही डिसेंबर २०२२ पर्यंतच्या आकडेवारी आहे.
देशात वक्फची सर्वाधिक मालमत्ता हैदराबादमध्ये आहे. म्हणूनच याला भारताची वक्फ राजधानी म्हटले जाते. या शहरात सुमारे 77,000 वक्फ मालमत्ता आहेत. जे देशातील एकूण वक्फ मालमत्तेच्या 30% आहे.देशातील सर्वात श्रीमंत वक्फ मंडळ तेलंगणाचे आहे. या मंडळाचे वार्षिक उत्पन्न 500 कोटी रुपये आहे.तर मालमत्तेच्या संख्येनुसार उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 1.5 लाख मालमत्ता आहेत. वक्फची सर्वाधिक मालमत्ता असलेली पाच राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल होय.
advertisement
महाराष्ट्रात वक्फची किती जागा?
सध्या महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे एकूण 23 हजार 566 मालमत्ता आहेत. या मालमत्तांचे एकत्रित क्षेत्रफळ तब्बल 37 हजार 330.97 हेक्टर आहे. या मालमत्तांमध्ये मशिदी, दर्गाह, कब्रस्ताने, मदरसे, मदत संस्था, शाळा, हॉस्पिटल्स आणि काही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या जमिनींचा समावेश आहे. या मालमत्तांचे विभाजन महाराष्ट्रातील सहा महसूल विभागांमध्ये झालेले आहे.यात कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद.
advertisement
सर्व विभागांमध्ये औरंगाबाद विभाग वक्फ मालमत्तांच्या बाबतीत आघाडीवर आहे. येथे एकूण 15 हजार ८७७ मालमत्ता आहेत आणि त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ 23 हजार 121.10 हेक्टर आहे. हे क्षेत्र महाराष्ट्रातील एकूण वक्फ जमिनींपैकी सर्वाधिक आहे. इतिहासात मागे वळून पाहिल्यास मुघल आणि निजाम काळात मोठ्या प्रमाणात इस्लामिक दानधर्म करण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून औरंगाबाद आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात वक्फ मालमत्ता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. यामध्ये अनेक मशिदी, दर्गाह आणि धार्मिक शिक्षणसंस्था आहेत. या विभागाची धार्मिक आणि सांस्कृतिक समृद्धी केवळ मुस्लिम समाजापुरती मर्यादित न राहता, ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा राज्याच्या वारशाचा भाग आहे.
advertisement
दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे. येथे एकूण 2 हजार 728 वक्फ मालमत्ता असून त्यांचे क्षेत्रफळ 3,724.55 हेक्टर आहे. पुणे हे राज्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. त्यामुळे येथील जमीन अत्यंत मौल्यवान ठरते. या विभागातील अनेक वक्फ मालमत्ता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहेत.
कोणत्या राज्यात सर्वाधिक वक्फ मालमत्ता? हे शहर म्हणजे ‘भारताची वक्फ राजधानी’
नाशिक विभागात 1 हजार455 मालमत्ता असून, त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ 3 हजार 340 हेक्टर इतके आहे. नाशिक हे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर असून येथे पंचवटी, त्र्यंबकेश्वर यांसारखी पवित्र स्थळे आहेत. वक्फ मालमत्ता बहुतेक वेळा कृषी किंवा धार्मिक उपयोगासाठी वापरल्या जातात.
advertisement
नागपूर विभागात केवळ 470 वक्फ मालमत्ता आहेत. मात्र त्यांच्या ताब्यातील क्षेत्रफळ मात्र 3 हजार 704.25 हेक्टर इतके आहे. म्हणजेच इतर विभागांच्या तुलनेत मालमत्ता कमी असल्या तरी भूभाग मोठा आहे. नागपूरच्या आसपासच्या भागात या जमिनी असण्याची शक्यता आहे.
वक्फ बोर्डाला सर्वाधिक जमीन कोणी दान केली? यादी वाचून तुम्ही थक्क व्हाल
कोकण विभागात एकूण 1 हजार 724 वक्फ मालमत्ता आहेत आणि त्यांचे क्षेत्रफळ 2 हजार 339 हेक्टर इतके आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई यांसारखी शहरे येतात. येथे असलेल्या वक्फ मालमत्तांचे बाजारमूल्य इतर विभागांच्या तुलनेत अधिक आहे. कारण या मालमत्ता शहराच्या मध्यवर्ती किंवा उपनगरांमध्ये आहेत.
advertisement
अमरावती विभागात एकूण 1 हजार 310 मालमत्ता आहेत. मात्र त्यांचे क्षेत्रफळ फक्त 1 हजार 102 हेक्टर इतकेच आहे. इथे मालमत्तांची संख्या बरीच असून त्या तुलनेत क्षेत्रफळ कमी आहे.
मराठी बातम्या/Explainer/
महाराष्ट्रात वक्फ बोर्डाकडे किती मालमत्ता? डोळे विस्फारतील; कोणी दान केली? सर्वाधिक जागा कोणत्या जिल्ह्यात!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement