wolf attack: भारताच्या या कोपऱ्यात लांडगे का झाले नरभक्षक? माणसांवर का करत आहे हल्ले?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
लांडगे माणसांवर हल्ला करत नाहीत आणि त्यांच्यापासून दूर राहतात असा सर्वसाधारण समज आहे. असं असताना लांगडे माणसांवर हल्ला का करत आहेत?
बहराइच: उत्तर प्रदेशातल्या बहराइचमध्ये लांडग्यांची दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत या भागात त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. लहान मुलं आणि माणसं त्यांचे बळी ठरत आहेत. लांडगे माणसांवर हल्ला करत नाहीत आणि त्यांच्यापासून दूर राहतात असा सर्वसाधारण समज आहे. असं असताना लांगडे माणसांवर हल्ला का करत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रश्न : उत्तर प्रदेशातल्या बहराइचमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यांमागचं कारण काय?
उत्तर : लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्यांमागे अनेक कारणं आहेत. त्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. अन्न कमी झालं आहे. शिवाय निसर्गाशी त्यांनी राखलेला तोलही कमी झाला आहे. पर्यावरण आणि वन्यजीवांशी निगडित तज्ज्ञ या कारणांना प्राधन्य देत आहेत. जंगलं कमी झाल्याने आणि त्यांना खाण्यासाठी भक्ष्य सापडत नसल्याने लांडग्यांची वर्तणूक बदलत आहे. पूर्वी ते मानवी वस्तीपासून दूर राहत होते; पण आता मानवी वसाहती विस्तारत आहेत आणि लांडग्यांच्या अधिवासापर्यंत पोहचल्या आहेत. म्हणून त्यांनी आता माणसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
प्रश्न : लांडग्यांच्या अलीकडच्या हल्ल्यांमागे घाघरा नदीला आलेला पूर कारणीभूत असल्याचं का म्हटलं जात आहे?
उत्तर : वनविभागाशी संबंधित अधिकारी व तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की या भागातून घाघरा नदी वाहते. पुरामुळे लांडग्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीच्या जवळ यावं लागलं आहे. सामान्यतः लांडगे नद्यांच्या जवळ राहतात, जेणेकरून त्यांना नैसर्गिक अन्न आणि पाणी मिळू शकेल. पुरामुळे त्यांना आपला अधिवास सोडावा लागला आहे. परिणामी त्यांना अन्न आणि पाणी या दोन्हींची कमतरता भासत आहे. अचानक अधिवास सोडावा लागल्यामुळे ते तणावाखालीदेखील असतील. जोपर्यंत ते आपल्या जुन्या जागी परत जात नाहीत तोपर्यंत त्यांची दहशत असेल.
advertisement
प्रश्न : पाऊसदेखील याला कारणीभूत आहे का?
उत्तर : पुरामुळे लांडग्यांना आपला अधिवास सोडावा लागला आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीदेखील त्यांच्या स्थलांतराला कारणीभूत आहे. पावसात त्यांना इतरत्र राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या आणि तणाव वाढला असावा. म्हणून त्यांनी मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश केला आहे.
प्रश्न : लांडगे सहसा लहान मुलांवर हल्ले का करतात?
उत्तर : सहसा लांडग्यांच्या समूहात सहा लांडगे एकत्र राहतात आणि ते सावजावर एकत्र हल्ला करतात. त्यांना कदाचित हे समजलं असावं, की लहान मुलांवर हल्ला करणं जास्त सोपं आहे. लहान मुलं त्यांना जास्त प्रतिकार करू शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून लांडग्यांनी लहान मुलांना ओढून नेल्याच्या घटना वाढल्या आहेत.
advertisement
प्रश्न : मिक्स ब्रीड लांडगे म्हणजे काय आणि ते माणसांसाठी धोकादायक का मानले जात आहेत?
उत्तर : वुल्फ डॉग ब्रीड ही एक धोकादायक प्रजात आहे. लांडगा आणि कुत्र्यांच्या संकरातून ही जात अस्तित्वात आली आहे. त्यांना वुल्फ डॉग म्हणतात. त्यामध्ये जंगली आणि पाळीव प्राण्यांच्या जनुकांचं मिश्रण असतं. हे प्राणी जसजसे ते मोठे होतात तसतसं त्यांचं वर्तन लांडग्यांसारखं होतं. ते अतिशय आक्रमक असतात आणि त्यांना नियंत्रित करणंदेखील कठीण असतं. फक्त उत्तर प्रदेशातच नाही, तर अनेक देशांमध्ये वुल्फ डॉग धोकादायक बनत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये पळून गेलेल्या वुल्फ डॉग्जनी लहान कुत्र्यांना ठार मारल्याच्या आणि माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्राण्यांचं प्रजनन सुरू ठेवावं का, लोकांनी अशा प्राण्यांना घरी ठेवावं की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.
advertisement
प्रश्न : बहराइचमधल्या लांडग्याच्या हल्ल्यांमध्ये मिश्र जातीच्या लांडग्यांचा समावेश आहे का?
उत्तर : ही शक्यता नाकारता येत नाही. कारण, कुत्रे आणि लांडग्यांमधली नेहमीच चांगली जवळीक असते. त्यामुळे वुल्फ डॉगसारख्या अनेक नवीन प्रजाती निर्माण होत आहेत. यापैकी काही प्रजाती घरात पाळीव प्राणी म्हणूनदेखील ठेवले जातात. पण ते अधिक आक्रमक आणि अधिक धोकादायक असतात. अलीकडेच उत्तर प्रदेशात अशा 25 जातींच्या कुत्र्यांवर बंदी घातली होती. या जातीचे प्राणी माणसांना फारसे घाबरत नाहीत आणि आक्रमकही होतात.
advertisement
प्रश्न : देशात सर्वांत जास्त लांडग्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे? तिथेही हल्ल्यांच्या घटना घडतात का?
उत्तर : भारतात सर्वांत जास्त लांडगे मध्य प्रदेशात आहेत. 2021मधल्या पशुगणनेनुसार, मध्य प्रदेशात सुमारे 700 लांडगे आहेत. पण तिथे असे हल्ले झाल्याचं वृत्त कधीच समोर आलेलं नाही. कारण तिथली जंगलं त्यांच्यासाठी पुरेशी ठरत आहेत. मध्य प्रदेशात जंगलाजवळच्या भागात वाहणाऱ्या नद्यांना शक्यतो पूर येत नाहीत. त्यामुळे प्राण्यांना अधिवास सोडून मानवी वस्तीच्या जवळ येण्याची गरज पडत नाही.
advertisement
प्रश्न : भारतातल्या कोणत्या राज्यांना लांडग्यांच्या हल्ल्यांचा फटका बसला आहे?
उत्तर : ऐतिहासिक नोंदींनुसार, भारतात 8व्या शतकाच्या उत्तरार्धात लांडग्यांचे हल्ले झाले होते. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांना लांडग्यांच्या हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षांत वारंवार हल्ले होत आहेत. 1904मध्ये उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लांडग्यांनी 75 मुलांवर हल्ला केला होता. त्यापैकी 50 हल्ले प्राणघातक ठरले होते. हजारीबाग भागात 1000 ते 1900 च्या दरम्यान लांडग्यांनी 200 हून अधिक मुलांना मारलं आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला हल्ले झाले होते. त्यामुळेसुद्धा लहान मुलांचे मृत्यू झाले होते. 2012मध्ये जम्मू-काश्मीर, बंगाल आणि यूपीमध्ये लांडग्यांचे हल्ले झाल्याची नोंद आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
September 03, 2024 8:23 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
wolf attack: भारताच्या या कोपऱ्यात लांडगे का झाले नरभक्षक? माणसांवर का करत आहे हल्ले?