भारतातील 'हे' गाव आशिया खंडात आहे साक्षरतेत अव्वल! लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये आहे नोंद
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील धोर्रा माफी हे आशियातील सर्वाधिक सुशिक्षित गाव मानले जाते. येथे 90% पेक्षा जास्त साक्षरता दर असून अनेक लोक IAS अधिकारी, डॉक्टर, वैज्ञानिक आणि प्राध्यापक झाले आहेत. 2002 मध्ये...
आपला देश जगभरात आपली संस्कृती, अन्न, कला आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. पण, भारत शिक्षणाच्या बाबतीतही कोणापेक्षा मागे नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील जवां ब्लॉकमध्ये असलेले धोर्रा माफी गाव संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध आहे. किंबहुना, हे गाव केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात जास्त शिक्षित गाव आहे. अलीगढच्या या गावातील लोक शेतीऐवजी नोकरी करतात.
90 टक्क्यांपेक्षा जास्त लोक साक्षर अन् नोकरदार
अलीगढ जिल्ह्यातील धोर्रा माफी गावाची लोकसंख्या सुमारे 10-11 हजार आहे. गावातील 90 टक्क्यांहून अधिक लोक साक्षर आहेत. या गावातील सुमारे 80 टक्के लोक देशभरातील अनेक उच्च पदांवर कार्यरत आहेत. गावातील अनेकजण डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि आयएएस अधिकारी बनले आहेत. धोर्रा माफी गाव अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला लागून आहे. त्यामुळे, तेथील प्राध्यापकांनी आणि डॉक्टरांनी आपली घरे गावात बांधली आहेत.
advertisement
लोक करतात शेतीऐवजी नोकरी
अलीगढमधील धोर्रा माफी नावाच्या या गावचे स्थानिक रहिवासी तैयब खान सांगतात की, 2002 मध्ये धोर्रा माफी गावाचे नाव 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठीही या गावाचे नाव निवडण्यात आले होते. धोर्रा माफी गावात सिमेंटची घरे, 24 तास वीज आणि पाणी आणि अनेक इंग्रजी माध्यमाची शाळा आणि महाविद्यालये आहेत. येथील लोक शेतीऐवजी नोकरीवर अवलंबून असतात.
advertisement
इथले लोक आहेत आयएएस, कुलगुरू अन्...
शहरातील धोर्रा माफी गावातील लोक खूप स्वावलंबी आणि शिक्षित आहेत. शिक्षणाच्या बाबतीत येथील महिलाही पुरुषांच्या बरोबरीने आहेत. या गावचे डॉ. सिराज हे आयएएस अधिकारी आहेत. याशिवाय, फैज मुस्तफा हे एका विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. या गावातील एक मोठा वर्ग परदेशातही राहत आहे. हे गाव नेहमीच शिक्षणाच्या बाबतीत चर्चेत असते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2025 5:08 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
भारतातील 'हे' गाव आशिया खंडात आहे साक्षरतेत अव्वल! लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये आहे नोंद










