advertisement

समुद्राच्या 6560 फूट तळाशी सुरूय खोदकाम, शोधला जातोय खजाना, सापडला तर 'हा' देश होईल मालामाल!

Last Updated:

चीन दक्षिण चीन समुद्राच्या 6560 फूट खोलीत ‘Tiangong’ नावाचे डीप-सी स्पेस स्टेशन उभारत आहे. 2030 पर्यंत ते कार्यान्वित होईल. हायड्रोथर्मल वेंट्समधून ऊर्जा स्रोत शोधण्याचा हा प्रयत्न असून यामध्ये सोनं, चांदी...

News18
News18
चीन सध्या अनेक अनोखे प्रयोग करत आहे. अंतराळात अमेरिकेशी स्पर्धा करत असलेल्या चीनने आता समुद्राच्या आत असं काहीतरी केलं आहे, ज्यामुळे जग चकित झालं आहे. चीन दक्षिण चीन समुद्राच्या 6560 फूट खाली 'डीप-सी स्पेस स्टेशन' बांधत आहे. जरी याचा उद्देश समुद्राच्या आत लपलेला 'खजिना' शोधणे असला तरी, याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आज आपण या स्पेस स्टेशनबद्दलची प्रत्येक माहिती जाणून घेणार आहोत.
चीनचे 'डीप-सी स्पेस स्टेशन' समुद्रसपाटीपासून 2000 मीटर खाली असेल. यात एकावेळी 6 शास्त्रज्ञ एक महिन्यापर्यंत काम करू शकतील. हे स्पेस स्टेशन 2030 पर्यंत काम सुरू करेल. त्याची रचना 250 टन वजनाच्या, 22 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 8 मीटर उंच असलेल्या एका लहान पाणबुडीसारखी असेल. याला 'तियांगोंग' म्हणजेच 'स्वर्गाचा महाल' असे नाव देण्यात आले आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, त्याचा उद्देश समुद्राच्या आत संशोधन करणे आणि समुद्रात असलेले नैसर्गिक स्रोत शोधणे आहे.
advertisement
काय खजिना शोधला जात आहे?
शास्त्रज्ञांच्या मते, चीन खोल समुद्रात असलेल्या गरम आणि थंड पाण्याचे संशोधन करेल. कारण या ठिकाणी मिथेन असलेले हाइड्रोथर्मल व्हेंट्स आहेत. या व्हेंट्समध्ये मिथेन हायड्रेट्स म्हणजेच ज्वलनशील बर्फाचा मोठा साठा आहे, जो ऊर्जा स्त्रोत ठरू शकतो. दुसरे म्हणजे, येथून भूकंपसारख्या हालचालींवर संशोधन करता येईल. इतकेच नाही, तर जर कोणत्याही देशाने जमीन हलवण्याचा प्रयत्न केला, जसे की कोणी न्यूक्लीअर टेस्ट करण्याचा प्रयत्न केला, तर ते आधीच कळेल. त्सुनामीची माहितीही काही तास आधीच उपलब्ध होईल.
advertisement
हाइड्रोथर्मल व्हेंट म्हणजे काय?
हाइड्रोथर्मल व्हेंट्स हे गरम पाण्याचे स्रोत आहेत जे समुद्राच्या तळाशी असलेल्या भेगांमधून बाहेर पडतात, जे समुद्राच्या हालचालीमुळे तयार होतात. हे व्हेंट्स खोल समुद्रातील ज्वालामुखीच्या जवळ आढळतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली अनेक किलोमीटर असलेल्या मॅग्माच्या संपर्कात येणारे पाणी गरम करून पुन्हा समुद्रात सोडतात.
हाइड्रोथर्मल व्हेंट कसा तयार होतो?
जेव्हा थंड पाणी समुद्राच्या तळाशी असलेल्या भेगांमध्ये प्रवेश करते, तेव्हा ते पृथ्वीच्या आतील भागात असलेल्या मॅग्माच्या संपर्कात येऊन 400°C पर्यंत गरम होते. खनिजांनी परिपूर्ण पाणी पुन्हा बाहेर येते. जेव्हा हे गरम पाणी समुद्राच्या तळाशी परत येते, तेव्हा त्यात अनेक प्रकारचे विरघळलेले खनिजे आणि वायू असतात, ज्यामुळे हाइड्रोथर्मल व्हेंट तयार होतो.
advertisement
हाइड्रोथर्मल व्हेंट्सचे दोन प्रकार
  1. ब्लॅक स्मोकर : हे खोल समुद्रात आढळते. त्यातून बाहेर पडणारे पाणी खूप गरम असते, सुमारे 350-400°C. यात जास्त प्रमाणात सल्फाइड खनिजे असतात, त्यामुळे ते काळ्या धुरासारखे दिसते.
  2. व्हाईट स्मोकर : हे थोडे कमी गरम (100-300°C) असते. त्यातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि बेरियमचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ते रंगात पांढरे दिसते.
advertisement
खरा खजिना
येथील हाइड्रोथर्मल व्हेंट्स अंधाऱ्या आणि अत्यंत दबावाच्या वातावरणात अद्वितीय जीवांना जगण्याची संधी देतात. येथील जीव सूर्यप्रकाशाशिवाय रासायनिक ऊर्जेतून आपले अन्न तयार करतात. या व्हेंट्समधून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमध्ये सोने, चांदी, तांबे आणि जस्त यांसारखी मौल्यवान धातू आढळतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, गुरूचा चंद्र युरोपा आणि शनिचा चंद्र एन्सेलाडसमध्येही असेच व्हेंट्स असू शकतात, जिथे जीवनाची शक्यता आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/General Knowledge/
समुद्राच्या 6560 फूट तळाशी सुरूय खोदकाम, शोधला जातोय खजाना, सापडला तर 'हा' देश होईल मालामाल!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement