भारतातील पावरफुल आणि सुंदर महाराणी; जिचा राज्यातील मंत्रीवर जडला जीव, त्यांच्या प्रेमकथेनं घडवला इतिहास

Last Updated:

रामास्वामी यांची वायसरायच्या पत्नीशीही जवळीक होती, असंही बोललं जात होतं. मात्र, त्यांचं प्रेम महाराणीशी अधिक दृढ होतं. दोघंही खुलेआम एकत्र दिसायचे. हे संबंध इतके चर्चेत आले की, त्रावणकोरच्या लोकांना देखील याची जाणीव झाली.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : भारत स्वतंत्र होत असताना काही रियासतं अत्यंत संपन्न आणि प्रगत होत्या. त्यापैकी दक्षिण भारतातील त्रावणकोर (आताचा तिरुअनंतपुरम) ही मोठी आणि प्रभावी रियासत होती. पण, भारतात विलीन होण्यास त्रावणकोरनं स्पष्ट नकार दिला होता. त्याच दरम्यान, येथील महाराणी सेथु लक्ष्मीबाई आणि त्यांच्या प्रभावशाली मंत्री (दीवान) सर सीपी रामास्वामी यांचं प्रेम बहरलं. दोघांनीही आपल्या प्रेमाचा खुलेआम स्वीकार केला, जो चर्चेचा विषय बनला.
महाराणी सेथु लक्ष्मीबाई विधवा होत्या आणि राज्याचा कारभार त्यांच्याच हातात होता. तर सीपी रामास्वामी (मंत्री) उंच, देखणा आणि हुशार होता. त्यांचे इंग्रज अधिकाऱ्यांशी देखील चांगले संबंध होते. त्यांच्या या प्रभावामुळेच त्यांची त्रावणकोरच्या दीवानपदी नियुक्ती झाली.
रामास्वामी यांची वायसरायच्या पत्नीशीही जवळीक होती, असंही बोललं जात होतं. मात्र, त्यांचं प्रेम महाराणीशी अधिक दृढ होतं. दोघंही खुलेआम एकत्र दिसायचे. हे संबंध इतके चर्चेत आले की, त्रावणकोरच्या लोकांना देखील याची जाणीव झाली.
advertisement
महाराणी सेथु लक्ष्मीबाई
महाराणी सेथु लक्ष्मीबाई
सीपी रामास्वामी यांच्या कार्यपद्धतीवर त्रावणकोरच्या लोकांना फारसा विश्वास नव्हता. त्यांना भारतात विलीन व्हायचं होतं, पण रामास्वामींनी महाराजाला आपल्या प्रभावाखाली ठेवून त्रावणकोरला स्वतंत्र घोषित केलं. यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. त्यांच्यावर एका व्यक्तीनं चाकूने हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्रावणकोरनं अखेर भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
त्रावणकोर भारतात विलीन झाल्यानंतर महाराणी मद्रास आणि नंतर बंगळुरूमध्ये स्थायिक झाल्या. त्यांनी तिथे बंगला बांधून आयुष्याच्या शेवटच्या 25 वर्षांत शांत जीवन जगलं. 1985 साली त्यांचा निधन झाला. दुसरीकडे, सीपी रामास्वामी लंडनला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. 1966 साली लंडनमध्येच त्यांचा मृत्यू झाला.
ही अनोखी प्रेमकथा आणि सत्तेचा संघर्ष आजही इतिहासाच्या पानांवर जिवंत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
भारतातील पावरफुल आणि सुंदर महाराणी; जिचा राज्यातील मंत्रीवर जडला जीव, त्यांच्या प्रेमकथेनं घडवला इतिहास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement