गोव्याच्या नाईट क्लबमध्ये सुरू होता कॅबरेट डान्स, अचानक पबने घेतला पेट? VIDEO VIRAL
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शनिवारी मध्यरात्री गोव्यातील नाईट क्लबमध्ये मोठा अग्नितांडव बघायला मिळाला आहे. या दुर्घटनेत एकूण २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
शनिवारी मध्यरात्री गोव्यातील नाईट क्लबमध्ये मोठा अग्नितांडव बघायला मिळाला आहे. या दुर्घटनेत एकूण २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात गोव्याला फिरायला आलेल्या काही पर्यटकांसह स्टाफचा समावेश आहे. आता या घटनेचा नाईट क्लबमधील कथित व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक तरुणी स्टेजवर कॅबरेट डान्स करताना दिसत आहे.
डान्स सुरू असताना अचानक क्लबच्या छताला आग लागल्याचं दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये छताला आग लागल्यानंतर काही सेकंदात ही आग संपूर्ण क्लबमध्ये पसरल्याचं दिसत आहे. अनेक प्रसार माध्यमांकडून हा व्हिडीओ गोव्यातील नाईट क्लबमधील असल्याचा दावा केला जातोय.
मात्र काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगितलं जात आहे. न्यूज १८ लोकमतने या व्हिडीओची पुष्टी केली नाही. पण व्हायरल व्हिडीओत शॉर्ट सर्कीटमुळे क्लबच्या छताला आग लागल्याचं दिसत आहे.
advertisement
दुसरीकडे, गोव्यातील अग्निकांडाबद्दल माहिती देताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, गोव्यातील नाईटक्लबमध्ये काही क्षणातच मृतदेहांचा खच पडला होता. उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात एका नाईटक्लबमध्ये आग लागली तेव्हा किमान १०० लोक डान्स फ्लोअरवर डान्स करत होते. आग लागताच काहीजण किचनच्या दिशेनं पळाले, जे किचनमध्ये कर्मचाऱ्यांसह अडकले आणि यात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
view commentsLocation :
Goa
First Published :
December 07, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/गोवा/
गोव्याच्या नाईट क्लबमध्ये सुरू होता कॅबरेट डान्स, अचानक पबने घेतला पेट? VIDEO VIRAL


