Dombivli: डोंबिवलीतली धक्कादायक घटना, पलावा सिटीसमोर खाडीत आढळला सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह
- Reported by:AJIT MANDHARE
- Published by:Sachin S
Last Updated:
डोंबिवलीतील डायघर परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये ही सुटकेस आढळली
डोंबिवली: डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पलावा सिटी समोरील खाडीमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही सुटकेस इथं कुणी आणि का टाकली पोलीस याचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील डायघर परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये ही सुटकेस आढळली होती. खाडीच्या बाजूला स्थानिक लोकांना सुटकेस आढळली. सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिकांनी संशय आला त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुटकेस उघडून पाहिली असता आतमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह एका २५ वर्षीय तरुणीचा असल्याचं समोर आलंय. या तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने सुटकेसमध्ये मृतदेह कोंबला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
मात्र, या तरुणीचा मृत्यू कशामुळे झाला, हे मात्र अजून कळू शकलं नाही. या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. ही सुटकेस आणि तरुणीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी परिसरातील स्थानिकांची चौकशी सुरू केली आहे. तसंच, सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून इथं टाकला की खाडीच्या पाण्यात वाहून आली, याचा देखील पोलीस तपास करत आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Nov 24, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli: डोंबिवलीतली धक्कादायक घटना, पलावा सिटीसमोर खाडीत आढळला सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह










