KDMC: 'सन्मानजनक प्रस्ताव आला तर..' ठाकरे गटाची नवी भूमिका, कल्याण डोंबिवलीत मोठा ड्रामा होणार?
- Published by:Sachin S
Last Updated:
कल्याण डोंबिवलीमधील नवनिर्वाचित नगरसेवक आणि ठाकरे सेनेचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. मनसेकडून कारवाईचे संकेत दिले जात आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जर शिवसेना आणि भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर विचार करू, असं आश्चर्यकारक भूमिका आता ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत नवीन राजकीय नाट्य घडण्याची चिन्ह आहे.
मनसेने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीमधील नवनिर्वाचित नगरसेवक आणि ठाकरे सेनेचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आज मुंबईत येऊन मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नवीन नगरसेवकांचं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं. या भेटीनंतर गटनेते उमेश बोरगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
advertisement
"आम्ही सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो. पुढील वाटचाल कशी असायला पाहिजे या संदर्भात चर्चा केली आणि साहेबांनी मार्गदर्शन केलं. जर पाठिंबा बाबत कोणी विचारला आणि सन्मानपूर्वक असेल विचार केला जाईल. महायुती पाठिंबा मागत आहे . भाजपकडून काय प्रस्ताव येतोय ते पाहू. सन्मानपूर्वक सगळ्या गोष्टी झाल्या तर विचार करू, अशी प्रतिक्रिया गटनेचे उमेश बोरगावकर यांनी दिली.
advertisement
तसंच,"भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना संपर्क करण्यात येत आहे. जो काही प्रस्ताव येईल, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. काही जण आमच्या संपर्कात नाही. जे नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल' असंही बोरगावकरांनी स्पष्ट सांगितलं.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 10:31 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC: 'सन्मानजनक प्रस्ताव आला तर..' ठाकरे गटाची नवी भूमिका, कल्याण डोंबिवलीत मोठा ड्रामा होणार?









