Shocking Crime : मिस्त्री की सैतान? दिवसा घाम गाळून करायचा काम अन् रात्र होताच... कल्याणमधील धक्कादायक कांड आलं समोर
Last Updated:
Kalyan Crime News : कल्याण शहरातून एका मिस्त्रीचं धक्कादायक कांड पोलिसांनी समोर आणलं आहे. जिथे दिवसभर उदरनिर्वाहासाठी काम करत असलेल्या या व्यक्तीने असं काही केलं ज्याने नागरिकांची झोप उडवली होती.
कल्याण : कल्याण शहरात मिस्त्रीचं काम करुन एकजण उदरनिर्वाह करत होता. मात्र काही दिवसांत पोलिसांसमोर एक धक्कादायक कांड समोर आले, ज्याने सर्वजण हादरुन गेलं आहेत.
नशेसाठी नियत फिरली
मिळालेल्या माहितीनुसार, दिवसा मिस्त्रीचे काम करुन जगत असलेल्या एका व्यक्तीन नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीची वाट पकडल्याचे समोर आले आहे. स्वता:कडे असलेल्या पैशाची कमी जाणवल्यानंतर त्याने सहज कसे पैसे मिळवता येतील त्यासाठी दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली.
कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या घटनेचा छटा लावत ललित देवरे(वय33) या आरोपीत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासाता ललितकडून चोरीच्या दोन ते चार दुचारी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात असलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
'ललित'दुचाकी चोरीच्या विळख्यात कसा अडकला?
शहरातील वाढत्या बाईच चोरीच्या घटनांचा तपास उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करुन सुरु होता. या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शहरातील एक संशयित आरोपी हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात राहत असल्याचे समोर आले आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सिन्नर येथे जाऊन सापळा रचला.
advertisement
पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजन आणि अचून माहितीच्या आधारे ललितला ताब्यात घेण्यात आले. ललितने चौकशीदरम्यान नशेखोरीसाठी पैसे जमवण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. ललित शहरातील विविध परिसरातून पार्क केलेल्या बाइवर लक्ष ठवत त्यानंतर योग्य संधी साधत चोरी करत असल्याचेही उघड केले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे कल्याण शहरवासियांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या सतर्कतेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होते आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 8:55 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking Crime : मिस्त्री की सैतान? दिवसा घाम गाळून करायचा काम अन् रात्र होताच... कल्याणमधील धक्कादायक कांड आलं समोर










