advertisement

Dombivli News: डोंबिवलीत नारीशक्ती एकवटली, हजारो महिलांनी केला विश्वविक्रम; इतिहासाची गिनीजमध्ये नोंद

Last Updated:

Dombivli Lezim News: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील हजारो महिला आणि विद्यार्थीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादन करत वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.

News18
News18
डोंबिवली: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील 9 हजार 111 महिला, विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी सकाळी डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रिडा संकुल मैदानामध्ये लेझिम वादन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळेतल्या विद्यार्थीनींनी आणि महिला भगिनींसह आदींनी एकत्र येत 9,111 एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळेतील विद्यार्थिनी आणि अनेक महिला एकत्र येत त्यांनी मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. सध्या या सामुहिक लेझिम वादनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तब्बल साडेपाच मिनिटं विद्यार्थिनी आणि महिलांनी वेगवेगळे प्रात्याक्षिके सादर करून हा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
advertisement
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी हजारो महिला एकत्र येऊन लेझिम खेळण्याचा विक्रम सांगलीकरांच्या नावावर होता. त्या तब्बल 7 हजार 338 महिलांनी एकत्र येत तो विक्रम रचला होता. पण सांगलीकरांनी रचलेला विक्रम मोडित काढत महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीमध्ये ठाणे जिल्ह्यातील महिलांनी त्यांच्या नावावर विक्रम केल्याची घोषणा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. लंडनमधील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी नवीन विक्रमाची घोषणा केली आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रवींद्र चव्हाण यांना प्रमाणपत्र आणि पदक प्रदान केले.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News: डोंबिवलीत नारीशक्ती एकवटली, हजारो महिलांनी केला विश्वविक्रम; इतिहासाची गिनीजमध्ये नोंद
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement