advertisement

Dombivli Shocking News : घराचा उघडा दरवाजा पाहून सुटला मोह; डोंबिवलीच्या चाळीत भरदिवसा भयान कांड

Last Updated:

Dombivli House Theft News : डोंबिवलीच्या ठाकुर्ली भागात चोरट्याने घरातून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून तपास सुरू आहे.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील मोठा गाव परिसरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. रेतीबंदर लोटेवाडी भागातील शिवशंभू चाळीत राहणारे राजू सलिम यांच्या घरात चोरट्याने प्रवेश करून मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू लंपास केल्या. ही घटना रविवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
उघडा दरवाजा पाहून गुन्हेगाराने गाठलं घर
राजू सलिम हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या काळात त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटे आणि सामानाची झडती घेत चोरट्याने सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सायंकाळी घरी परतल्यानंतर घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्याने सलिम यांना चोरी झाल्याचा संशय आला. तपासणी केली असता दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घर सुरक्षित ठेवण्याबाबत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli Shocking News : घराचा उघडा दरवाजा पाहून सुटला मोह; डोंबिवलीच्या चाळीत भरदिवसा भयान कांड
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement