advertisement

KDMC Metro Work : कल्याण-डोंबिवलीतील मेट्रोची कामे थांबवण्याची मागणी, काय आहे कारण?

Last Updated:

kalyan-Dombivl Metro Update : कल्याण-डोंबिवलीतील मेट्रोची काम पुढच्या महिन्यात थांबण्याची शक्यता आहे. यामागील नेमकं कारण काय आहे आणि नेमकी कोणती याची मागणी केली आहे.

Kalyan Dombivli metro work halt during board exams
Kalyan Dombivli metro work halt during board exams
कल्याण : राज्यात फेब्रुवारी ते मार्च 2026 या कालावधीत दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत. या काळात कल्याण आणि डोंबिवली शहरातील नागरिकांची शहरात सुरु असलेल्या मेट्रोची कामं थांबवण्याची मागणी केली जात आहे.
मेट्रोच्या रात्रंदिवस चालणाऱ्या कामांमुळे विद्यार्थी त्रस्त
कल्याण आणि डोंबिवली शहरात सध्या मोठ्या प्रमाणात मेट्रोची काम सुरु आहेत, यामुळे शहरातील जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहे. या सर्वांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते आणि यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे अत्यंत आवश्यक असते.मात्र या कामामुळे याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
त्याचबरोबर शिळफाटा रोड, कल्याण-मुरबाड मार्ग तसेच इतर प्रमुख रस्त्यांवर सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे चालू आहेत. या सर्व कामांमुळे रोज सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थी केंद्रावर वेळेत कसे पोहोचणार?
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, तणाव वाढू नये यासाठी ही कामे तात्पुरती थांबवावीत अशी मागणी डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
advertisement
या मागणीसंदर्भात संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर आणि सरचिटणीस किशोर सोरखादे यांनी एमएमआरडीए तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत मेट्रो आणि प्रमुख रस्त्यांची कामे तात्पुरती स्थगित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Metro Work : कल्याण-डोंबिवलीतील मेट्रोची कामे थांबवण्याची मागणी, काय आहे कारण?
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement