advertisement

BMC ने 4 महिने आधीच बांधला पूल, पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ नाही, मुंबईकर हैराण!

Last Updated:

Mumbai News: तब्बल 4 महिने आधी पुलाचे पुनर्बांधणी व विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. मात्र, उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

BMC ने 4 महिने आधीच बांधला पूल, पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ नाही, मुंबईकर हैराण!
BMC ने 4 महिने आधीच बांधला पूल, पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ नाही, मुंबईकर हैराण!
मुंबई: दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पुलाचे काम अवघ्या 15 महिने आणि 6 दिवसांत विक्रमी वेळेत पूर्ण करूनही अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. मुंबई महापालिकेने अंतिम मुदतीच्या तब्बल 4 महिने आधी पुलाचे पुनर्बांधणी व विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. मात्र, उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचा बेलासिस रोड) हा पूल मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना रेल्वेमार्गावरून पूर्व–पश्चिम जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हा पूल सुरू झाल्यास जहांगीर बोमन बेहराम मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग (ग्रॅण्ट रोड), पठ्ठे बापूराव मार्ग तसेच महालक्ष्मी स्थानकाजवळील पुलावरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
advertisement
महापालिकेने युद्धपातळीवर काम करत पुलावरील डांबरीकरण, संरक्षक रेलिंग तसेच विद्युत रोषणाईची सर्व कामे पूर्ण केली आहेत. पूल बांधकाम पूर्ण होऊनही वरिष्ठ नेत्यांची वेळ न मिळाल्याने उद्घाटन रखडल्याची टीका होत आहे.
दरम्यान, बेलासिस पूल बंद असल्यामुळे मुंबई सेंट्रल, ताडदेव आणि भायखळा परिसरातील वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. वाहनांना लांबचा वळसा घ्यावा लागत असल्याने प्रवासाचा वेळ 30 ते 40 मिनिटांनी वाढत आहे. नायर आणि जे. जे. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.
advertisement
कसा आहे नवा पूल?
पुलाची एकूण लांबी 333 मीटर असून पूर्व बाजूची लांबी 138.39 मीटर, पश्चिम बाजूची लांबी 157.39 मीटर आणि रेल्वे हद्दीतील लांबी 36.90 मीटर आहे. वाहतूक मार्गाची रुंदी 7 मीटर असून दोन्ही बाजूंना पुरेशा रुंदीचे पदपथ देण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुलाला संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र तसेच सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र रेल्वेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC ने 4 महिने आधीच बांधला पूल, पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ नाही, मुंबईकर हैराण!
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement