advertisement

नवरदेव बोहल्यावर चढणार, तितक्यात पोलिसांची एन्ट्री; कारनामे ऐकून सगळेच हादरले, डोंबिवली इथं काय घडलं?

Last Updated:

Dombivli Crime News : डोंबिवली शहरात सुरु असलेल्या एका लग्नाच्या कार्यक्रमातून पोलिसांनी नवरदेवाला अटक केलेली आहे. नेमके हे प्रकरण काय होते आणि काय घडले त्याबाबत जाणून घ्या.

Dombivli girl exploitation case by marriage promise
Dombivli girl exploitation case by marriage promise
डोंबिवली : लग्नाच्या दिवशी नवरदेवासह सर्वांची गडबड सुरु असते. नवरही तिच्या नवरदेवाची उत्सुकतेने वाट पाहत असते. मात्र जर तितक्यातच लग्नाच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर?, डोबिंवली शहरातून असेच एक प्रकरण समोर आलेले आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर बलात्कार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तरुणीसोबत निकाह करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अरमान यांची ओळख एका ऑनलाइन गेम अॅपद्वारे झाली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून दोघांमध्ये मैत्री आणि प्रेमसंबंध होते. दरम्यान तरुणी 18 वर्षांची झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भिवंडीतील शांतीनगर परिसरात शुक्रवारी निकाह करण्याची तयारी सुरू होती.
advertisement
मात्र, निकाह सोहळ्याची तयारी सुरू असतानाच एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतल्याने परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर हे प्रकरण शांतीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि तरुणी डोंबिवलीतील असल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी तिला पुढील चौकशीसाठी विष्णूनगर पोलिस ठाण्यात पाठवले. तिथे दिलेल्या तक्रारीत तरुणीने अरमानने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला.
advertisement
या तक्रारीच्या आधारे विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेखविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
नवरदेव बोहल्यावर चढणार, तितक्यात पोलिसांची एन्ट्री; कारनामे ऐकून सगळेच हादरले, डोंबिवली इथं काय घडलं?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement