advertisement

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदाराच्या घराची एसीबीकडून झडती; हॉटेलवरही पोहोचलं पथक

Last Updated:

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची टीम दाखल झाली आहे. पथकाकडून तपासणी सुरू आहे.

News18
News18
रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची टीम दाखल झाली आहे. एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी यांच्या घराची झडती सुरू आहे. साळवी यांचे जुने घर आणि हॉटेलवरही एसबीचं पथक पोहोचलं आहे. तिथेही झडती सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजन साळवी यांच्या घरी पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान आतापर्यंत एकूण सहावेळा राजन साळवी हे एसबीच्या चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी एसबीचं पथक दाखल झालं आहे, राजन साळवी यांच्या घराची झडती सुरू आहे. साळवी यांच्या घरातील वस्तूची आणि सामानाची नोंद घेतली जात आहे. दरम्यान साळवी यांचे जुने घर आणि हॉटेलवरही एसबीचं पथक पोहोचलं आहे. तिथेही झडती सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
advertisement
राजन साळवी यांची प्रतिक्रिया
राजन साळवी ही व्यक्ती काय आहे आणि कशी आहे? हे माझ्या पक्षाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहित आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, त्यामुळे मी या गोष्टींची काळजी करत नाही. माझा पक्ष माझ्या पाठिशी आहे. अशी प्रतिक्रिया यावर राजन साळवी यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/कोकण/
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदाराच्या घराची एसीबीकडून झडती; हॉटेलवरही पोहोचलं पथक
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement