काळजी घ्या! मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणालाही अलर्ट Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यात सध्या अवकाळी पावसाचे ढग जमा झाले असून, पुढील काही दिवस हवामानात बदल अपेक्षित आहेत. विशेषतः मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात सध्या अवकाळी पावसाचे ढग जमा झाले असून, पुढील काही दिवस हवामानात बदल अपेक्षित आहेत. विशेषतः मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. पाहुयात 29 मार्च रोजी राज्यातील काही प्रमुख शहरांमधील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड यांसारख्या कोकणातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरसहमध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असे संकेत आहेत. विदर्भात मात्र तुलनेने कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी तापमानात वाढ होऊ शकते.
advertisement
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यास सांगितले आहे, तर किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे मार्चच्या शेवटी राज्यात काहीसा गारवा जाणवेल, परंतु त्याचवेळी वीज पडण्याचा धोका आणि वादळामुळे होणारे संभाव्य नुकसान याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
advertisement
हवामानातील या बदलामुळे दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामान अंदाजावर लक्ष ठेवून आपल्या कामांचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान खात्याच्या मते, हा बदल पुढील चार ते पाच दिवस कायम राहील आणि त्यानंतर हवामानात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 28, 2025 8:15 PM IST
मराठी बातम्या/कोकण/
काळजी घ्या! मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणालाही अलर्ट Video