Nilesh Rane : मन रमत नाहीय, राजकारणातून निवृत्तीबाबत नेमकं काय म्हणाले निलेश राणे

Last Updated:

२०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकिट दिलं जाईल अशी चर्चा होती. पण आता अचानक निलेश राणे यांनी राजकारणातून थेट निवृत्तीचीच घोषणा केल्यानं खळबळ उडालीय.

News18
News18
सिंधुदुर्ग, 24 ऑक्टोबर : सक्रीय राजकारणात मन रमत नसल्याचं सांगत माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी सक्रिय राजकाणातून निवृत्ती जाहीर केलीय. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी याबाबत घोषणा केलीय. मी सक्रीय राजकारणातून कायमचा बाजूला होत असल्याचं ट्विट निलेश राणे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. निलेश राणे यांनी सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर करत ही घोषणा केली. यात त्यांनी आपल्याला सर्वांनी प्रेम दिलंत त्याबद्दल आभारी असल्याचंही म्हटलं आहे. भाजपमध्येही प्रेम भेटलं, संघटनेत काम करायची संधी मिळाल्याने आपण नशीबवान असल्याचं राणेंनी पोस्टमध्ये म्हटलं.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निलेश राणे हे २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्येही ते लोकसभेच्या मैदानात उतरले पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसला रामराम करत वडिलांनीच काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. त्याच पक्षाच्या तिकिटावर २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांचा पुन्हा पराभव झाला.
advertisement
लोकसभेनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानतंर राज्यात त्यांना सचिव पदाची जबाबदारी दिली गेली. तसंच कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे काम सोपवण्यात आले होते. २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकिट दिलं जाईल अशी चर्चा होती. पण आता अचानक निलेश राणे यांनी राजकारणातून थेट निवृत्तीचीच घोषणा केल्यानं खळबळ उडालीय.
advertisement
पोस्टमध्ये नेमकं काय?
नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
advertisement
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!
view comments
मराठी बातम्या/कोकण/
Nilesh Rane : मन रमत नाहीय, राजकारणातून निवृत्तीबाबत नेमकं काय म्हणाले निलेश राणे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement