Breaking news : निलेश राणेंचा सक्रिय राजकारणातून संन्यास; केली मोठी घोषणा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून कायमचं बाजूला होत असल्याची घोषणा केली आहे.
मुंबई, 24 ऑक्टोबर : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून कायमचं बाजूला होत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. निलेश राणे यांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023
advertisement
नेमकं काय म्हटलं निलेश राणे यांनी?
view comments'नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!' असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2023 12:54 PM IST


