पावसाळ्यात भजी खाऊन सुद्धा वजन कमी करता येईल? जाणून घ्या लो कॅलरीज पकोड्यांची रेसिपी

Last Updated:

वजन कमी करणाऱ्या आणि फिटनेस फ्रिक लोकांसाठी खास लो कॅलरीज पकोड्यांची रेसिपी घेऊन आलो आहोत.

पावसाळ्यात भजी खाऊन सुद्धा वजन कमी करता येईल? जाणून घ्या लो कॅलरीज पकोड्यांची रेसिपी
पावसाळ्यात भजी खाऊन सुद्धा वजन कमी करता येईल? जाणून घ्या लो कॅलरीज पकोड्यांची रेसिपी
पावसाळ्यात चहा सोबत गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे समीकरण जीभे सह मनाला देखील आनंद देऊन जाते. परंतु भजी पकोड्यांमध्ये भरपूर कॅलरीज असल्याने वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना मात्र ते खाता येत नाही आणि पावसाळ्यात भाजी खाण्याच्या आनंदाला ते मुकतात. मात्र आता तसे होणार नाही. कारण आम्ही वजन कमी करणाऱ्या आणि फिटनेस फ्रिक लोकांसाठी खास लो कॅलरीज पकोड्यांची रेसिपी घेऊन आलो आहोत.
पॅन ग्रिल्ड मिक्स व्हेज पकोडे :
प्रथम, एक वाडगा घेऊन त्यात 1 चमचा कॉर्नफ्लोर, चवीनुसार मीठ, तिखट आणि मिरपूड घाला. हे सर्व एकत्र करा, नंतर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या आणि कॉर्न घाला, चांगले एकत्र करून घ्या. प्रीहेटेड नॉनस्टिक पॅनमध्ये पिठाचा पातळ थर पसरवा, ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब घाला आणि बाजू पलटवून पूर्ण शिजवून घ्या. किंवा तुम्ही हे मुश्रण अप्प्याच्या भांड्यामधे टाकून देखील बनवू शकता. पॅन ग्रिल्ड मिक्स व्हेज पकोडे दही सोबत खाऊ शकता.
advertisement
कॉटेज चीज पकोडे :
कॉटेज चीज पकोडे तयार करण्यासाठी हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कॉटेज चीजला कापून घ्या. मग त्याच्या कोटिंगसाठी पीठ बनवण्या करता एका भांड्यात पाणी, मीठ, मिरपूड, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, लसूण पावडर, मिक्स हर्ब्स एकत्र करा. मग त्यात रवा मिसळा आणि या मिश्रणात कॉटेज चीज क्यूब्स कोट करा. मग हे पकोडे चांगले बेक करून घ्या.
advertisement
पालक पकोडा :
पालकची भाजी नीट धुवून मग ती बारीक चिरून घ्या. मग एका वाडग्यात ती भाजी काढून घ्या आणि त्यात चवीनुसार, ऑलिव्ह ऑईल, लसूण, मिरची आणि कॉनफ्लॉवर टाका. मग यात पाणी टाकून मिश्रण थोडे भिजवून घ्या. मग हे पकोडे पॅनमध्ये परतून घ्या. मग दही किंवा कोणत्याही ओल्या चटणीसोबत खा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पावसाळ्यात भजी खाऊन सुद्धा वजन कमी करता येईल? जाणून घ्या लो कॅलरीज पकोड्यांची रेसिपी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement