धक्कादायक! 14 वर्षांचं पोर 'हार्ट अटॅक'ने गेलं; डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले, "लहान मुलांमध्येही..."

Last Updated:

जमशेदपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विजय नंदन यांचा 14 वर्षांचा एकुलता एक मुलगा साई, जो डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता, आज त्याचं...

A 14-year-old boy died of a heart attack
A 14-year-old boy died of a heart attack
विजय नंदन यांचा 14 वर्षांचा एकुलता एक मुलगा साई याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) मृत्यू झाला. साई बिस्टुपूरच्या डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत होता. तो नेहमीच हसमुख आणि निरोगी मुलगा म्हणून ओळखला जात होता. ही झारखंडच्या जमशेदपूरच्या सिदगोरा पोलीस स्टेशन परिसरातील बस्ती क्रमांक 10 मध्ये गुरुवारी ही अत्यंत दुःखद घटना घडली.
डोकेदुखीनंतर हृदयविकाराचा झटका
ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता घडली. साई टाॅयलेटमधून परतल्यानंतर त्याला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. आई-वडिलांना वाटलं की ही सामान्य डोकेदुखी आहे, म्हणून त्यांनी त्याच्या डोक्याला तेल लावून आराम करायला सांगितलं. पण थोड्याच वेळात वेदना असह्य झाल्या. चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी तात्काळ त्याला बारिडीहा येथील मर्सी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्याची तब्येत आणखी बिघडायला लागली; ऑक्सिजन दिल्यानंतरही तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी गंभीर अवस्था पाहून त्याला टाटा मेन हॉस्पिटल (TMH) मध्ये रेफर केलं.
advertisement
डॉक्टरांनी मृत घोषित केले
टीएमएचमध्ये पोहोचेपर्यंत रात्रीचे 9:30 वाजले होते, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी साईला मृत घोषित केलं. मुलाच्या अकाली निधनामुळे विजय नंदन आणि त्यांचं कुटुंब खूप दुःखात आहे. साईचे काका सच्चिदानंद यांनी सांगितलं की, डॉक्टरांच्या अहवालानुसार साईचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. पूर्णपणे निरोगी आणि हसमुख मुलगा अचानक जग सोडून कसा गेला, हे कुटुंबियांना अजूनही स्वीकारता येत नाहीये.
advertisement
साईच्या काकांनी हेही सांगितलं की, बुधवारी रात्री साईने वडिलांचे पाय चेपले होते. जेव्हा वडिलांनी त्याला असं करण्यापासून थांबवलं, तेव्हा साई हसला आणि म्हणाला होता, "मला आज तुमचे पाय चेपायला खूप आवडतंय." हे आठवून कुटुंबातील सदस्य रडत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. परिसरात शोकाकुल शांतता आहे. साईचे अंत्यसंस्कार शुक्रवारी करण्यात आले.
advertisement
डॉक्टर काय म्हणतात?
सदर हॉस्पिटलचे डॉक्टर रणजीत पांडा यांनी या घटनेला असामान्य आणि चिंताजनक म्हटलं आहे. ते म्हणाले की, हृदयविकाराचा झटका सहसा वृद्धांना येतो, पण किशोरवयीन मुलांमध्ये अशी घटना दुर्मिळ आहे. मानसिक ताण, चुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा जास्त शारीरिक श्रम ही देखील यामागील कारणं असू शकतात. तथापि, सविस्तर तपासणी आणि कुटुंबियांशी बोलल्यानंतरच नेमकं कारण कळू शकतं. ही घटना समाजासाठी एक इशारा आहे की, मुलांच्या आरोग्याबाबत सावध राहणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचं झालं आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
धक्कादायक! 14 वर्षांचं पोर 'हार्ट अटॅक'ने गेलं; डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले, "लहान मुलांमध्येही..."
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement