Tur Dal Side Effects: डायबिटीस, हार्ट ॲटकवर गुणकारी तूरडाळ, तरीही ‘या’ रूग्णांसाठी ठरते धोकादायक

Last Updated:

Side Effects of Tur Dal: तूरडाळ हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. डायबिटीस, हार्ट ॲटॅकवर गुणकारी असलेली तूरडाळ ‘हे’ आजार असलेल्या व्यक्तींसाठी धोक्याची ठरू शकते.

Tur Dal Side Effects: डायबिटीस, हार्ट ॲटकवर गुणकारी तूरडाळ, तरीही ‘या’ रूग्णांसाठी ठरते धोकादायक
Tur Dal Side Effects: डायबिटीस, हार्ट ॲटकवर गुणकारी तूरडाळ, तरीही ‘या’ रूग्णांसाठी ठरते धोकादायक
मुंबई: डाळी हा भारतीयांच्या जेवणातील एक मुख्य पदार्थ आहे. व्यक्ती शाकाहारी असो की मांसाहारी, त्याच्या जेवणात डाळ, डाळीच्या भाज्या किंवा वरण हे असतंच. देशातल्या अनेक राज्यांमध्ये रोजच्या जेवणात तूरडाळ आढळून येते. तूरडाळ हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. मात्र तरीही काही आजार असलेल्या व्यक्तींसाठी तूरडाळ धोक्याची ठरू शकते. जाणून घेऊयात तूरडाळ खाण्याचे फायदे आणि तोटे.

रक्तदाब नियंत्रित राहतो

ज्यांच्या रक्तदाबात चढउतार होत असतो अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात तूरडाळीचा समावेश करायला हवा. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन कमी नियंत्रणात राहतं

तूरडाळीत प्रथिनांसोबत फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. फायबर्समुळे पोट भरलेले राहून वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement

पचन सुधारण्यात मदत

तूरडाळीतल्या फायबर्समुळे खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होते. अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळतो.

Benefits & Side Effects of Tur Dal: ‘हे’ आजार असलेल्या रूग्णांसाठी खाऊ नये तूरडाळ

तूरडाळ खाण्याचे तोटे (Tur dal Side Effects)

तूरडाळीचे अनेक फायदे जरी असले तरीही काही रूग्णांसाठी तूरडाळ ही धोक्याची आहे. ज्या व्यक्तींना किडनी, युरिक ॲसिडचा त्रास आहे अशा व्यक्तींनी तूरडाळ खाणं टाळावं. ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यांनेच तूरडाळ खावी. जर तूरडाळ खाल्ल्याने काही रिॲक्शन झाली तर लगेच डॉक्टरांना जाऊन भेटा. तूरडाळ ही पचनासाठी फायद्याची जरी असली तरीही ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी रात्री तूरडाळ खाणं टाळावं. रात्री तूरडाळ खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tur Dal Side Effects: डायबिटीस, हार्ट ॲटकवर गुणकारी तूरडाळ, तरीही ‘या’ रूग्णांसाठी ठरते धोकादायक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement