अविवाहितांमध्ये वाढतोय 'हा' खास आजार, लग्नापूर्वी बरा करणं का गरजेचं? डॉक्टरांनी जरा स्पष्टच सांगितलं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा कोणताही साधा ताण (Stress) नसून, त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण हा आजार केवळ लग्न मोडत नाही, तर व्यक्तीचे संपूर्ण भावनिक आणि सामाजिक आयुष्य विस्कळीत करतो.
मुंबई : देशात लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. तुमच्या आजूबाजूला अनेक लोक लग्नबंधनात अडकताना तुम्हाला दिसतील. सेलिब्रिटिच नाही तर अनेक लोक आता लग्न करत आहेत. बाजारात लगबग आहे, हॉल बुकिंग्स आणि खरेदीचा जोर वाढला आहे. एकीकडे आनंदाचे वातावरण असले तरी, डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, आजकाल अनेक तरुण-तरुणी एका खास मानसिक समस्येने (Mental Health Issue) त्रस्त आहेत. ही समस्या त्यांच्या वैयक्तिक आणि भावनिक आयुष्यावर थेट परिणाम करत आहे.
डॉक्टरांनी ही अविवाहितांमधील एक समस्या सांगितली जी खूपच गंभीर आहे, मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे येणाऱ्या अविवाहित तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या रुग्णांमध्ये एक 'खास' मानसिक समस्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणले आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे वैवाहिक जीवनासाठी धोकादायक ठरू शकते. ही समस्या आहे 'गॅमोफोबिया' (Gamophobia), म्हणजे लग्नाची किंवा कायमस्वरूपी नातेसंबंधाची अति तीव्र भीती असणे.
advertisement
हा कोणताही साधा ताण (Stress) नसून, त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण हा आजार केवळ लग्न मोडत नाही, तर व्यक्तीचे संपूर्ण भावनिक आणि सामाजिक आयुष्य विस्कळीत करतो.
गॅमोफोबिया: 'शिकलेले' तरुण का पडतात शिकार?
जयपूरमधील मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, गॅमोफोबियाचे बळी होणारे बहुतेक रुग्ण उच्चशिक्षित, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करणारे आणि पूर्णपणे आत्मनिर्भर असतात. आयुष्यात सर्वकाही सुरळीत असूनही, लग्नाचे नाव काढताच त्यांच्या मनात प्रचंड भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. ही भीती त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हरवल्यासारखे किंवा भविष्यात नात्यात अपयश येण्याची प्रचंड चिंता वाटते.
advertisement
तीस वर्षांवरील वयोगटातील अविवाहितांमध्ये हा फोबिया अधिक प्रमाणात दिसून येतो. या लोकांना स्वतःलाही कळत नाही की ते मानसिक समस्येने ग्रस्त आहेत. परिणामी, ते सतत लग्न टाळतात आणि कधी-कधी कुटुंबाच्या दबावाखाली लग्न झालेच, तर ते नाते फार काळ टिकत नाही.
लग्नाआधी उपचार का आवश्यक?
डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, गॅमोफोबिया बरा न करता लग्न केल्यास, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात:
advertisement
फोबियामुळे व्यक्ती सतत तणावात राहते, ज्यामुळे वैवाहिक जीवनात वारंवार वाद आणि भावनिक दुरावा (Emotional Distance) निर्माण होतो.
-शारीरिक लक्षणे: लग्नाच्या विचारानेही पॅनिक अटॅक येणे, धडधड वाढणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
-लग्नानंतरही 'कमिटमेंट'ची भीती कायम राहिल्यास, ते नाते कधीच यशस्वी होत नाही आणि अनेकदा त्याचा शेवट घटस्फोटात (Divorce) होतो.
advertisement
-स्वतःचे आरोग्य: सततच्या मानसिक ताणामुळे व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो.
गॅमोफोबिया बरा होऊ शकतो
गॅमोफोबिया पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी वेळेवर लक्षणे ओळखणे आणि तज्ज्ञांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.
यामध्ये मुख्यत्वे सायकोथेरपी (Psychotherapy), समुपदेशन (Counselling) आणि विशेषत: कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) चा समावेश असतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टर औषधोपचारही करतात.
advertisement
लग्नापूर्वी योग्य उपचार घेतल्यास, व्यक्ती लग्नाचा निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेऊ शकते आणि निरोगी वैवाहिक जीवन जगू शकते.
जर तुमच्या आजूबाजूला कोणी सातत्याने लग्नाचा विषय टाळत असेल आणि त्याला अनावश्यक भीती वाटत असेल, तर त्याला मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास नक्की सांगा. कारण भावनिक आरोग्य स्थिर असल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय यशस्वी होऊ शकत नाही.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 10:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अविवाहितांमध्ये वाढतोय 'हा' खास आजार, लग्नापूर्वी बरा करणं का गरजेचं? डॉक्टरांनी जरा स्पष्टच सांगितलं


