Video: सणासुदीला चेहऱ्यावर ग्लो हवाय? घरच्या घरी ट्राय करा कॉफीचे 5 फेसपॅक
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
मूड फ्रेश करण्यासाठीच नाही तर चेहरा फ्रेश करण्यासाठीही कॉफीचा वापर करू शकता. ट्राय करा हे 5 फेसपॅक
वर्धा, 27 ऑगस्ट: अनेकांची सकाळ गरमागरम चहासोबत होत असली तरी कॉफीचे चाहतेही कमी नाहीत. कामाचा कंटाळा आला की मूड फ्रेश होण्यासाठी अनेकांची पसंती कॉफीला असते. पण हीच कॉफी चेहऱ्याला लावून तुम्ही तजेलदारपणा मिळवू शकता. बहिणभावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय. सणाच्या दिवशी प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असं वाटत असेल. तर तुम्ही कॉफीचे हे 5 फेसपॅक ट्राय करू शकता. याबाबत वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे यांनी माहिती दिलीय.
कॉफीचे 5 सोपे फेसपॅक
1) एक चमचा कॉफी,1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध या तिन्ही वस्तू एकत्र करा. चेहऱ्यावर बोटाने किंवा ब्रशने अप्लाय करा. 15 मिनिट ठेवा आणि साध्या पाण्याने धुऊन घ्या. तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.
2) एक चमचा कॉफी, एक लिंबाचा रस, एक चमचा बेसन आणि गरज वाटल्यास तुम्ही त्यात थोडा मध ऍड करू शकता. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यामुळे ड्राय त्वचेपासून चेहरा नॉर्मल होण्यास मदत होईल, असं खडसे सांगतात.
advertisement
3) एक चमचा कॉफी, एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबूचा रस एकत्र करून त्वचेवर स्क्रब करून लावा. कोपर तसेच गुडघे आणि स्किन टॅन झालेल्या ठिकाणी हे लावू शकता. या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की साखर वापरताना ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. जेणेकरून चेहऱ्यावर किंवा त्वचेवर मसाज करत असताना त्यापासून काही नुकसान होणार नाही.
advertisement
4) एक चमचा कॉफी, एक ते दोन चमचे गाईचं कच्चं दूध, एक चमचा बेसन आणि मध या वस्तू एकत्रित करून चेहऱ्यावर अप्लाय केल्यास त्याचाही चांगला ग्लो चेहऱ्यावर येऊ शकतो, असं ब्युटिशियन सांगतात.
5) एक ते दीड चमचा कॉफी, एक ते दोन चमचे गाईचं कच्चं दूध, एक चमचा कोकोनट ऑइल, बेसन या वस्तू एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. त्यामुळं या टिप्स नक्की करून पाहा, असं ब्युटीशयन सांगतात.
advertisement
घरच्या साहित्यातून तयार करा फेसपॅक
view commentsघरातील वस्तूंपासूनच हे फेसपॅक बनवू शकता. हे फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर कमी वेळात ग्लो आणण्यासाठी मदत करतील. कॉफी चेहरा उजळण्यास मदत करते. आता सण उत्सवाचे दिवस सुरू झालेले आहेत. या काळात घरातच तयार करून हे सोपे फेसपॅक नक्की ट्राय करा, असे ब्युटीशियन प्रीती खडसे सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
August 27, 2023 12:18 PM IST

              