Skin Care Tips : गुडघे आणि कोपरांवरील काळपटपणा घालवण्यासाठी बेस्ट उपाय, पहिल्या वापरतच दिसेल फरक!

Last Updated:

How to remove knee darkness : गुडघे आणि कोपरांचा काळेपणा आपल्यासाठी लाजिरवाणा ठरू शकतो. या काळेपणामुळे लहान कपडे घालण्यासही लाज वाटते. मात्र आपल्या घरातील एक साधी वस्तू हा काळेपणा घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे.

गुडघे आणि कोपरांचा काळेपणा असा घालवा..
गुडघे आणि कोपरांचा काळेपणा असा घालवा..
मुंबई : शरीराची संपूर्ण स्वच्छता केल्यानंतरही काहीवेळा काही भाग दुर्लक्षित राहतात किंवा ते साफ करणं राहून जात. ते भाग म्हणजे आपले गुडघे आणि कोपर. गुडघे आणि कोपरांचा काळेपणा आपल्यासाठी लाजिरवाणा ठरू शकतो. या काळेपणामुळे लहान कपडे घालण्यासही लाज वाटते. मात्र आपल्या घरातील एक साधी वस्तू हा काळेपणा घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे.
तुम्ही गुडघे आणि कोपरांच्या काळेपणाला कंटाळला असाल तर हे दूर करण्यासाठी तांदळाचा वापर करा. तांदळाच्या पिठाचा वापर केल्याने तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळतात. तांदळाच्या पिठाच्या पेस्टने काळेपणा सहज दूर होतो. चला तर मग जाणून घेऊया घरी तांदळाची पेस्ट कशी बनवायची आणि ती कशी वापरायची.
गुडघे आणि कोपरांचा काळेपणा असा घालवा..
सौंदर्य तज्ञ वर्षा यांच्या मते, बहुतेक लोक त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवताना त्यांच्या कोपर आणि गुडघ्यांकडे लक्ष देणे विसरतात. त्यामुळे कोपर आणि गुडघे काळे पडतात. जर तुम्हाला कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा असेल तर तांदळाचे पीठ सर्वोत्तम आहे. तांदळाचे पीठ शरीराचे टॅनिंग कमी करण्यास मदत करते. यासोबतच ते त्वचा उजळवण्यासाठी मदत करते.
advertisement
तांदळाच्या पिठापासून बनवा स्क्रब..
- हा स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ, मध, लिंबाचा रस आणि ग्लिसरीन हे साहित्य लागेल.
- स्क्रब बनवण्यासाठी, प्रथम एका भांड्यात थोडे तांदळाचे पीठ घ्या.
- या पिठात एक मोठा चमचा मध, लिंबाचा रस आणि थोडे ग्लिसरीन मिसळा.
- हे सर्व घटक व्यवस्थित मिसळा आणि नंतर हलक्या हाताने गुडघे आणि कोपरांवर लावून मसाज करा.
advertisement
- तुम्ही हे स्क्रब नियमितपणे वापरले तर कोपर आणि गुडघ्यांवरील काळेपणा सहज निघून जाईल. तुम्ही ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर देखील लावू शकता.
- तुम्हाला लिंबाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम किंवा अ‍ॅलर्जी जाणवत असेल तर ते वापरणे टाळावे.
हा उपाय देखील प्रभावी..
दूध आणि हळदीच्या मदतीनेही तुम्ही काळेपणा दूर करू शकता. यासाठी गरजेनुसार एक चमचा हळद दुधात मिसळा. नंतर ही पेस्ट गुडघ्यांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. हळद आणि दुधाची ही पेस्ट औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, जी गुडघ्यांवरचा काळेपणा दूर करण्यास मदत करते. तुम्ही ही पेस्ट नियमितपणे लावली तर तुमची त्वचा मऊ होईल.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care Tips : गुडघे आणि कोपरांवरील काळपटपणा घालवण्यासाठी बेस्ट उपाय, पहिल्या वापरतच दिसेल फरक!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement