Buttermilk Recipes : साधं किंवा मसाला ताक पिऊन बोअर झालात? ताकापासून बनवा 6 हेल्दी आणि टेस्टी डिशेस!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
6 healthy and tasty dishes From Buttermilk : बऱ्याच लोकांना रोज दही खायला जमत नाही. असे लोक ताक पितात. कारण ताकाचे दुष्परिणाम दह्याच्या तुलनेत कमी असतात. ताकापासून बनवता येणाऱ्या काही खास पदार्थांबद्दल आज आपण बोलणार आहोत. हे पदार्थ चविष्ट आणि तुमच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत.
मुंबई : भारतीय जेवणामध्ये पूर्णान्नाला महत्त्व आहे. म्हणूनच दिवसातलं एक जेवण तरी आपलं थाळी भरून असावं. म्हणजेच वरण, भात, भाजी, चपाती, त्यासोबत दही किंवा ताक.. बऱ्याच लोकांना रोज दही खायला जमत नाही. असे लोक ताक पितात. कारण ताकाचे दुष्परिणाम दह्याच्या तुलनेत कमी असतात. जेवणात दही किंवा ताक खाण्याचा उद्देश हा असतो की, आपले पचन सुधारावे आणि पोटात चांगले बॅक्टरीया वाढावे.
ताक पिणे सोयीचे आणि सुरक्षित मानले जाते. पण रोज साधं किंवा मसाला ताक पिऊनही आपल्याला ते नकोसं होऊ शकतं. अशावेळी जर ताकापासून बनवलेले काही खास पदार्थ आपण आपल्या आहारात सामील करू शकतो. ताकापासून बनवता येणाऱ्या काही खास पदार्थांबद्दल आज आपण बोलणार आहोत. हे पदार्थ चविष्ट आणि तुमच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत.
advertisement
ताकापासून बनवू शकता हे खास पदार्थ..
ताकाची कढी : ताकाची कधी दह्याचं कढीपेक्षा थोडी हलकी पण तिखट असते. ही कढी बेसन आणि ताक मिसळून बनवली जाते. याला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली जाते. ही कढी भातासोबत खूप छान लागते.
तिखट ताक : हे तिखट ताक बहुतेकवेळा नाश्त्यासाठी बनवले जाते. यामध्ये भाजलेली जिरेपूड, आले, कढीपत्ता आणि चिमूटभर मीठ घालतात. खूप हेव्ही जेवणानंतर हे ताक पिणे चांगले मानले जाते. करा हे पचनास मदत करते आणि आतडे निरोगी ठेवते.
advertisement
ताक भात : नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल यामध्ये भात आणि ताक वापरले जाते. याला तुम्ही वन पॉट मीलदेखील म्हणू शकता. यामध्ये भाजलेल्या लाल मिरच्या, भाजलेले जिरे, मीठ आणि मिरपूड घालतात, ज्यामुळे ते आणखी टेस्टी आणि मसालेदार बनते.
ताकाची व्हेज करी : ही डिश अत्यंत हेल्दी आणि टेस्टी आहे. जातं यामध्ये भरपूर भाज्या आणि ताक वापरले जाते. यामध्ये हंगामी भाज्या पातळ ताकाच्या ग्रेव्हीमध्ये उकळल्या जातात. तसेच हवे ते मसाले घालून याची चव आणखी वाढवली जाते. ही करी तुम्ही पराठा किंवा भातासोबत खाऊ शकता.
advertisement
ताकाचा रायता : दह्याचे अनेक प्रकारचे रायते आवण खातो. मात्र ताकाचा रायताही खूप टेस्टी असतो. ताकामध्ये कांदा आणि टोमॅटो घालतात. सोबतच याला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिली जाते. ही साईड डिश तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जेवणासोबत खाऊ शकता.
ताकाचा चिला : हा नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे. हा चिला बनवण्यासाठी रवा आणि बेसन ताकासोबत मिसळून बनवला जातो. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यादेखील टाकू शकता. तयार बॅटर तव्यावर टाकून दोन्ही बाजूने छान भाजल्यानंतर तुमि याचा आस्वाद घेऊ शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Buttermilk Recipes : साधं किंवा मसाला ताक पिऊन बोअर झालात? ताकापासून बनवा 6 हेल्दी आणि टेस्टी डिशेस!










