Carrom seeds benefits: शक्तीशाली ओव्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का? अशा पद्धतीने ओवा खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Carrom seeds in Marathi: ओवा हा एक प्रकारचा गरम मसाला असून तो जेवणाची चव वाढवतोच. मात्र ओव्याच्या औषधी गुणधर्मांमुळे ओवा खाणं किंवा ओव्याचं पाणी, ओव्याचा चहा पिणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
मुंबई : वैद्यकीय क्षेत्र कितीही पुढारलेलं जरी असलं तरीही अद्यापही आयुर्वेदाचं महत्त्व टिकून आहे. आजही अनेक लहानमोठ्या आजारांवर आयुर्वेदिक उपचारांद्वारे मात करता येते. आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन घरगुती उपचारांद्वारे त्याची पत्नी कॅन्सरमुक्त झाल्याचं सांगितलं होतं. यामध्ये किचनमधल्या गरम मसाल्यांची भूमिका प्रचंड महत्त्वाची होती. ओवा हा असाच एक किचनमधला महत्त्वाचा गरम मसाला आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत.
जाणून घेऊयात ओव्याच्या आरोग्यदायी फायद्याविषयी आणि त्याच्या औषधी गुणधर्मांविषयी.
आहारतज्ज्ञ श्रद्धा श्रीवास्तव यांच्या मते ओव्यात असलेल्या विविध पोषकतत्त्वांमुळे ओवा खाणं फायद्याचं ठरतं. ओव्यात प्रोटिन्स, फॅट्स, फायबर, कॅल्शियम, फायटोकेमिकल, फॉस्फरस, लोह आढळून येतं. ओव्यात नैसर्गिकरित्या अँटीसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणधर्मही आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे रोजच्या आहारात ओव्याचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांना दूर ठेवता येतं. तुम्हाला ओवा चावून खाणं आवडत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी आणि पद्धतीने ओव्याचा आहारात समावेश करू शकता.
advertisement
कोणत्या पद्धतीने ओव्याचा दैनंदिन आहारात समावेश करणं फायद्याचं ठरतं ?

ओव्याचं पाणी : आहारतज्ञांच्या मते, ओव्याचं पाणी पिण्याने विविध आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ओव्याचं पाणी पितात. यामुळे गॅसेस, ॲसिडिटी, अपचन आणि सारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. ओव्यात असलेले सक्रिय एंझाइम्स पचन प्रक्रियेला चालना देतात आणि गॅस्ट्रिक रसाचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे जेवण पचायला मदत होते. ज्यांना अपचानाचा त्रास आहे, त्यांनी ओव्याचं पिणं हे फायद्याचं ठरतं. तुम्ही ओव्याचं पाणी प्यायल्या सुरूवात केल्यापासून अवघ्या 1 ते 2 आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल
advertisement
ओव्याचा चहा : वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण ग्रीन टी, ब्लॅक टी पितात. तुम्हालाही जर ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिण्याची आवड असेल तर ओवा हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. चहाच्या भांड्यात गरम पाणी उकळत ठेवा. त्यात चहा पावडर ऐवजी ओव्याचे दाणे टाका. हलकीशी उकळ आल्यानंतर गाळून हा चहा प्या. ओव्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यापासून ते पोट साफ होण्यापर्यंत विविध फायदे तुमच्या शरीराला होतील. यात तुम्ही चिमूटभर हळद आणि आलंही किसून टाकू शकता.
advertisement
ओव्याचा तडका: अनेक महिला जेवणाला चव येण्यासाठी राई किंवा जिऱ्यांचा तडका देतात. राई आणि जिरं हे आरोग्यासाठी फायद्याचं आहेच, मात्र ओव्याचा तडका ही तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. यामुळे जेवणाला वेगळी चव तर येईलच मात्र त्यासोबत आरोग्याला फायदाही होईल.
advertisement
ओवा आणि लिंबाचा रसः ओव्याचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी कोमट पाण्यात भिजलेला ओवा टाकून त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी प्या. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकायला मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Carrom seeds benefits: शक्तीशाली ओव्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का? अशा पद्धतीने ओवा खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे