Kitchen tips: किड्यांना वैतागून फ्लॉवर खाणं सोडलंय; वापरा 'या' ट्रिक्स् करावी लागणार नाही फार मेहनत, किडे आपोआप येतील बाहेर
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Kitchen Tips: फ्लॉवरच्या विविध भागांमध्ये किडे लपून बसलेले असतात. त्यामुळे फ्लॉवर साफ करणं जिकरीचं काम होऊन जातं. अनेकांनी तर किड्यांच्या भीतीमुळे फ्लॉवर खाणं सोडून दिलंय. तुम्ही सुद्धा फ्लॉवर खाणं सोडलं असेल तर या टिप्स खास तुमच्यासाठी.
मुंबई : कोबी किंवा फ्लॉवर शाकाहारी भाजी म्हणून बाजारात सहज उपलब्ध असतात. अनेकांना कोबी आणि फ्लॉवर दोन्ही आवडतात. मात्र अनेकदा यातले किडे हे डोकेदुखी ठरतात. फ्लॉवरच्या तुलनेत कोबी साफ करणं तसं सोपं. कारण फ्लॉवरच्या विविध भागांमध्ये किडे लपून बसलेले असतात. त्यामुळे खाण्याआधी फ्लॉवर साफ करणं फार जिकरीचं काम होऊन जातं. असं म्हणतात हे किडे फार धोकादायक असतात. ते मेंदूमध्ये प्रवेश करून जीवघेणे ठरू शकरतात. अनेकांनी तर किड्यांच्या भीतीमुळे फ्लॉवर खाणं सोडून दिलंय. किड्यांच्या भीतीमुळे तुम्ही सुद्धा फ्लॉवर खाणं सोडून दिलं असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
जाणून घेऊयात फ्लॉवर स्वच्छ करण्याच्या सहजसोप्या टिप्स

मीठ पाण्याने धुवावं
बाजारातून फ्लॉवर विकत घेताना ते ताजं असेल याची खात्री करा. कारण शिळ्या किंवा डागळलेल्या फ्लॉवरमध्ये किडे असण्याची शक्यता अधिक असते. भाजी बनवण्यापूर्वी फ्लॉवरचे लहान तुकडे करा. त्यानंतर ते एका पांढऱ्या कपड्यावर पसरवून त्यात कोणता किडा दिसत तर नाही ना ते पाहा. त्यानंतर एका भांड्यात थोडं मीठ आणि पाणी टाकून त्यात त्यात फ्लॉवरचे तुकडे टाका. पाणी मंद आचेवर थोडं गरम करा. जर त्यात किडे असतील तर ते आपोआप बाहेर येतील.
advertisement
बर्फाच्या पाण्याने धुवावं
जर तुम्हाला पाणी गरम करायला कंटाळा आला असेल तर कापलेला फ्लॉवर तुम्ही बर्फाच्या पाण्याने धुवू शकता. याचा दुसराही फायदा होईल की शिजवताना फ्लॉवर जास्त गळणार नाही. साफकेल्यानंतर तुम्ही ते प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता.
advertisement
व्हिनेगरचा वापर
फ्लॉवर स्वच्छ करण्यासाठी तो आधी बारीक कापून घ्या. आता एका वाडग्यात पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर मिसळा. यात फ्लॉवर टाका. थोडा वेळ वाट पाहा. व्हिनेगर जंतू, जीवाणू आणि बुरशी काढून टाकण्यास मदत करतो. त्यामुळे जर तुमच्या फ्लॉवरमध्ये किडे असतील तर ते बाहेर येतील. फ्लॉवरमध्ये व्हिनेगरचा अंश नको असेल तर फ्लॉवरपुन्हा एता धुवून मग स्वच्छ पुसून ध्या.
advertisement
हळदीचा वापर
जर तुम्हाला व्हिनेगर नसेल वापरायचं तर तुम्ही हळदीचा वापर करू शकता. बारीक कापलेला फ्लॉवर तुम्ही पाण्यात उकळवत ठेवा. त्यात थोडीशी हळद घाला. यामुळे किडे तर बाहेर येतीलच मात्र हळद ही नैसर्गिक अँटिबायोटिक्स असल्यामुळे तो फ्लॉवरमध्ये तुमच्यासाठी अधिक पोषक बनेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 4:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen tips: किड्यांना वैतागून फ्लॉवर खाणं सोडलंय; वापरा 'या' ट्रिक्स् करावी लागणार नाही फार मेहनत, किडे आपोआप येतील बाहेर


