Unique Air Fryer Uses : शेफ पंकजने सांगितले एअर फ्रायरचे 10 अनोखे उपयोग; 'हा' उपयोग पाहून तर चक्रावून जाल!

Last Updated:

Chef Pankaj Bhadouria Shares Air Fryer Tips : प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी एअर फ्रायरचे असे 10 अनोखे आणि कमी ज्ञात उपयोग सांगितले आहेत, जे तुमच्या रोजच्या स्वयंपाकाला अधिक सुलभ, जलद आणि क्रिएटिव्ह बनवतात.

शेफ पंकज भदौरिया एअर फ्रायर टिप्स
शेफ पंकज भदौरिया एअर फ्रायर टिप्स
मुंबई : हल्ली एअर फ्रायर हे उपकरण प्रत्येक घरात आपली जागा पक्की करत आहे. कमी तेलात चविष्ट पदार्थ तयार करणे, काही सेकंदात रीहीटिंग, बेकिंग, रोस्टिंगपासून ते तंदूरी पदार्थांपर्यंत. एअर फ्रायरची क्षमता फक्त स्नॅक्सपुरती मर्यादित नाही. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी एअर फ्रायरचे असे 10 अनोखे आणि कमी ज्ञात उपयोग सांगितले आहेत, जे तुमच्या रोजच्या स्वयंपाकाला अधिक सुलभ, जलद आणि क्रिएटिव्ह बनवतात. चला तर जाणून घेऊया एअर फ्रायरचे हे बहुगुणी उपयोग.
फ्रेंच फ्राईज आणि नगेट्ससारखे कुरकुरीत स्नॅक्स बनवणे : एअर फ्रायर म्हटलं की सर्वप्रथम आठवतात ते म्हणजे फ्रेंच फ्राईज, नगेट्स आणि क्रिस्पी स्नॅक्स. हे पदार्थ अतिशय कमी तेलात चविष्ट आणि कुरकुरीत बनतात, त्यामुळे ते आरोग्यदायीही ठरतात. मुलांना आवडणारे स्नॅक्स बनवण्यासाठी एअर फ्रायर हा उत्तम पर्याय आहे.
क्रिस्पी रीहीटिंग : उरलेला पिझ्झा, सामोसा, रोल्स किंवा इतर कुरकुरीत पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले की ते ओलसर होतात. पण एअर फ्रायरमध्ये रीहीट केल्यास पदार्थ त्यांच्या मूळ कुरकुरीत टेक्श्चरमध्ये परत येतात. हा रीहीटिंगसाठीचा सर्वात स्मार्ट उपाय आहे.
advertisement
तंदूरी रेसिपीज : एअर फ्रायर एक छोटा तंदूर म्हणूनही काम करतो. पनीर टिक्का, सोया टिक्का, चिकन टिक्का. हे सर्व पदार्थ केवळ काही मिनिटांत तयार होतात. मॅरिनेट केलेले टिक्के बास्केटमध्ये ठेवून तापमान सेट करा आणि स्वादिष्ट तंदूरी रेसिपीज अगदी झटपट बनवा.
चिवडा आणि सुकामेवा भाजणे : चिवडा बनवण्यासाठी तुम्ही एअर फ्रायरची ग्रील काढून बेसमध्येच साहित्य घालू शकता. काही मिनिटांत खमंग चिवडा तयार होतो. तसेच बदाम, काजू, पिस्ता किंवा इतर सुकामेवा एअर फ्राय केल्यास त्यांची चव आणि सुगंध अधिक उठून दिसतो.
advertisement
केक, कुकीज आणि ब्रेडचे बेकिंग : एअर फ्रायरमध्ये सहजपणे केक, कपकेक, कुकीज, ब्रेडसुद्धा बनवता येतात. 180°C वर प्रीहीट करून बॅटर ठेवले की काही मिनिटांत छान फुललेला आणि चवदार केक तयार होतो. हे बेकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे.
हर्ब्स आणि भाज्या डिहायड्रेट करणे : मेथी, करीपत्ता, कांदा किंवा इतर भाज्या आणि हर्ब्स एअर फ्रायरमध्ये सहज सुकवता येतात. त्याचप्रमाणे चिप्ससारखे स्नॅक्सही न तळता झटपट तयार होतात, ज्यामुळे ते अधिक हेल्दी असतात.
advertisement
नान, कुलचा आणि पराठे बनवणे : अगदी तंदूरी टेक्श्चरचा नान किंवा कुलचा एअर फ्रायरमध्ये अप्रतिम बनतो. लाटलेल्या पिठाचे नान प्रीहीटेड एअर फ्रायरमध्ये 200°C वर 4–5 मिनिट शिजवले की परफेक्ट नान तयार होतो. पराठेही तितकेच स्वादिष्ट बनतात.
डीफ्रॉस्टिंगसाठी उत्तम पर्याय : फ्रीजरमधील चिकन, सोया चॉप्स किंवा इतर पदार्थ एअर फ्रायरमध्ये काही मिनिटांत डीफ्रॉस्ट करता येतात. त्यामुळे स्वयंपाकाची तयारी जलद होते.
advertisement
न तळता पुरी तयार करणे : एअर फ्रायरमध्ये नॉन-फ्राइड पुरी बनवणे हा एक भन्नाट उपाय आहे. पुरी उकळत्या पाण्यात उकळून एअर फ्रायरमध्ये 200°C वर 4 मिनिटे ठेवा, तयार होते हलक्या, कमी तेलात बनवलेल्या कुरकुरीत पुऱ्या.
बटाटे आणि रताळे भाजणे : बटाटे आणि रताळे घरच्या एअर फ्रायरमध्ये सुंदर भाजता येतात. ओव्हनची गरज नाही. हे कमी वेळात छान भाजले जातात स्वादिष्टही बनतात.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Unique Air Fryer Uses : शेफ पंकजने सांगितले एअर फ्रायरचे 10 अनोखे उपयोग; 'हा' उपयोग पाहून तर चक्रावून जाल!
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis: शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं
शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं
  • शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं

  • शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं

  • शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं

View All
advertisement