बाजारातलं विसरा आता घरच्या घरी तयार करा उटणे? सगळ्यात सोपी पद्धत Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीसाठी तुम्ही घरच्या घरीच उटणे तयार केल्यास ते फायद्याचे ठरू शकते.
वर्धा, 8 नोव्हेंबर: धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत पाच दिवस चालणारा दिवाळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्याकडे दिवाळीच्या दिवशी उटणे लावून अभ्यंगस्थान करण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाची आनंददायी सुरुवात उटणे लावूनच केली जाते. दिवाळी जवळ आली की बाजारात मोठ्या प्रमाणात उटणे पाहायला मिळतात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये केमिकल्स मिसळल्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच उटणे तयार केल्यास ते फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे घरच्या घरी उटणे कसे बनवायचे आणि त्याचे काय फायदे आहेत याची माहिती वर्ध्यातील जाणकार दर्शना पाकोजवार यांनी दिली आहे.
असे तयार करा घरगुरी उटणे
बाजारात जे उटणे विक्री होतात त्यात केमिकल्स मिसळलेले असल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरगुती उठणे वापरलेले कधीही उत्तम, असे दर्शना पाकोजवार सांगतात.
उटणे बनवण्यासाठी कृती
2 वाटी मसूर डाळ दळून घ्यायची, 1 वाटी बेसन ऍड करायचं, 4-5 चमचे संत्रा पावडर, 4-5 चमचे चंदन पावडर, अर्धी वाटी मुलतानी माती, 2 चमचे हळद, थोडं गुलाब पावडर टाकली तरी चालेल, ही पावडर तुम्हाला बनवून ठेवायची आहे. लावतेवेळी या पावडरमध्ये दूध किंवा गुलाब जल मिसळून लावायचे आहे. हे सगळे आयुर्वेदिक असून यापासून त्वचेला हानी पोहोचणार नाही, असे पाकोजवार सांगतात. या पावडरमध्ये दोन चमचे तीळ बदाम बारीक करून वापरू शकता तसेच तांदळाचे पीठही ऍड करू शकता.
advertisement
अंगणात लक्ष वेधून घेईन नक्षीदार मोर, दिवाळीला काढा आकर्षक रांगोळी, Video
नैसर्गिक सामग्रींपासून तयार केलेले उटणे लावल्यास त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल. घरच्या घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरून उटणे तयार करण्याची सोपी पद्धत आपण जाणून घेतली आहे. तुम्ही देखील हे उटणे बनवून यंदाच्या दिवाळीत वापरू शकता,जर तुमची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असेल तर उटणे लावण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Nov 08, 2023 7:00 PM IST







