रोजच्या साखरेचा वापर न करता बनवा झटपट लाडू, पाहा ही रेसिपी

Last Updated:

विदर्भातील घरोघरी दिवाळीत चविष्ट खास साखरेचे लाडू बनवले जातात. याची रेसिपी इथं पाहा.

+
रोजच्या

रोजच्या साखरेचा वापर न करता बनवा झटपट लाडू, पाहा ही रेसिपी

वर्धा, 8 नोव्हेंबर: दिवाळी म्हटलं की कंदील, रोषणाई, दिवाळीचा फराळ डोळ्यासमोर येतो. आठवडाभर आधीपासूनच दिवाळी फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग दिसून येते. अशावेळी काहीतरी नवीन गोड पदार्थ बनविण्याचा गृहिणींचा विचार असतो. बुऱ्याची साखर वापरून तुम्ही अतिशय चविष्ट असे लाडू बनवू शकता. विदर्भात दिवाळीला आवर्जून हे लाडू बनवले जातात. वर्धा येथील अश्विनी अंभोरे यांनी अगदी सोप्या पद्धतीनं बुऱ्याच्या साखरेच्या लाडूंची रेसिपी सांगितली आहे.
लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बुऱ्याची साखर म्हणजे बत्ताशासाठी जी साखर वापरली जाते ती होय. अंभोरे या ही साखर मध्य प्रदेशातून मागवत असल्याचं सांगतात. मात्र, ही साखर विदर्भात सर्वत्र मिळते. बुऱ्याच्या साखरेचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बुऱ्याची साखर, 1 वाटी बेसन, तूप, वेलची पूड आणि सुकामेवा हे साहित्य आवश्यक आहे.
advertisement
लाडू बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका कढईमध्ये एक वाटी तूप ॲड करून घ्यावे. त्यामध्ये एक वाटी बेसन ऍड करायचं. आता हे बेसन जवळजवळ 10-15 मिनिटे चांगलं भाजून घ्यायचं आहे. बेसनाचा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. खमंग सुवास सुटल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थोडं कोमट होण्यासाठी ठेवायचं आहे. कोमट झाल्यानंतर त्यात बुऱ्याची साखर ऍड करायची आहे. बेसन गरम असतानाच कढईत साखर टाकू नये कारण असे केल्याने साखर त्यात विरघळून जाईल आणि लाडू चांगले बनणार नाहीत, असं अंभोरे सांगतात.
advertisement
मिश्रण थोडं कोमट झाल्यावरच साखर ऍड करायची आहे. साखर ऍड केल्यानंतर चांगलं एकत्र करून त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकायची. त्यानंतर हे मिश्रण कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत. एक वाटी साखर एक वाटी बेसन या प्रमाणामध्ये सात ते आठ लाडू बनवून तयार होतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मिश्रण वाढवू शकता. मात्र समप्रमाणात बेसन आणि समप्रमाणात बुऱ्याची साखर घ्यायची आहे. खोबराकिसच्या साह्याने तुम्ही डेकोरेशन करून सर्व्ह करू शकता, असंही अंभोरे यांनी सांगितलं.
advertisement
सर्वांना आवडतील असे चविष्ट लाडू
बुऱ्याच्या साखरेचे लाडू आपल्या चवीनुसार गोड प्रमाण घेऊन बनवता येतील. चिमुकल्यांपासून घरातील वृद्धांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे बेसन आणि बुऱ्याचे लाडू आहेत. कितीही वेळ नसला तरीही वेळात वेळा काढून किमान चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे हे तरी प्रत्येक घरात केले जातेच. तर या दिवाळीला अगदी मोजक्या साहित्यात बुऱ्याच्या सखरेचे लाडू तुम्हीही झटपट बनवू शकता.
मराठी बातम्या/रेसिपी/
रोजच्या साखरेचा वापर न करता बनवा झटपट लाडू, पाहा ही रेसिपी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement