कूलरमधून येणाऱ्या वासानं त्रास होतोय? तर फाॅलो करा 'या' घरगुती टिप्स, दुर्गंधी होईल कायमची दूर

Last Updated:

प्रचंड उकाडा असतानाही अनेकांना कूलर चालू केल्यावर येणाऱ्या वासाचा त्रास होतो. खरगोनचे नीरज राठोर सांगतात की खराब दर्जाचं गवत किंवा स्वच्छता न राखल्यामुळे टाकीत पाणी सडतं आणि...

cooler smell solution
cooler smell solution
कडक उष्णतेचा काळ सुरू आहे. लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी एसी किंवा कूलरचा आधार घेत आहेत, पण अनेक लोकांची तक्रार असते की, कूलर चालू केल्यावर त्यातून एक विचित्र वास येतो, ज्यामुळे लोकांना तो वास घालवणं डोकेदुखी ठरलीय. जुन्या कूलरमध्येही अशीच परिस्थिती येते, जेव्हा त्यातील गवत बदलले जाते. पण काही घरगुती उपाय केल्यास ही समस्या कायमची दूर होऊ शकते.
नीरज राठौर, जे गेल्या 14 वर्षांपासून गुरुमॅक्स या नावाने कूलर बनवून विकतात, त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, कूलरमधून वास येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यात वापरलेलं गवत किंवा हनीकॉम्ब पॅड. बाजारात दोन ते तीन प्रकारचं गवत आणि हनीकॉम्ब उपलब्ध आहे. फिकट पिवळ्या रंगाच्या गवताची गुणवत्ता कमी असते आणि ते स्वस्तही मिळतं. तर, फिकट लाल रंगाचं गवत चांगल्या प्रतीचं मानलं जातं. हे गवत चिनारच्या झाडापासून बनवलेलं असतं, ज्याला वास येत नाही, उलट चांगला सुगंध येतो.
advertisement
कूलरला वास का येतो?
जर कमी प्रतीचं गवत किंवा हनीकॉम्ब वापरलं गेलं, तर त्यातून वास येण्याची शक्यता असते. याशिवाय, कूलरची टाकी बऱ्याच दिवसांपासून साफ न केल्यासही वास येऊ शकतो. कारण टाकीत काही प्रमाणात पाणी साचून राहतं, ज्यामुळे दुर्गंधी येण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या प्रतीचा कूलर खरेदी करणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण त्यात वापरलेलं गवत किंवा हनीकॉम्ब कूलिंग पॅड प्रयोगशाळेत तपासलेलं असतं.
advertisement
चांगल्या प्रतीचं गवत किंवा हनीकॉम्ब लावा
टाकी वेळोवेळी साफ करा. चांगल्या प्रतीचं गवत किंवा हनीकॉम्ब कूलिंग पॅड वापरा. जर तुम्ही जुन्या कूलरमध्ये गवत किंवा हनीकॉम्ब पॅड बदलत असाल, तर त्याच्या गुणवत्तेची विशेष काळजी घ्या. कूलर नेहमी खिडकीजवळ किंवा अशा ठिकाणी ठेवा, जिथे कूलर बाहेरची ताजी हवा शोषू शकेल आणि गरम हवा बाहेर टाकू शकेल.
advertisement
कूलर खस परफ्यूमचा वापर करा
नीरज सांगतात की, हे सर्व घरगुती उपाय करूनही जर कूलर चालू केल्यावर वास येत असेल, तर हा वास घालवण्यासाठी आणखी एक उत्तम आणि टिकाऊ पर्याय आहे. बाजारात कूलर खस नावाचं परफ्यूम उपलब्ध आहे, जे जास्त महागही नाही. ते गुणवत्तेनुसार वेगवेगळ्या दरात मिळतं. गरजेनुसार ते कूलरच्या टाकीत टाका, जेव्हा तुम्ही कूलर चालू कराल, तेव्हा तुमच्या संपूर्ण घरात हवेसोबत सुगंध दरवळेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कूलरमधून येणाऱ्या वासानं त्रास होतोय? तर फाॅलो करा 'या' घरगुती टिप्स, दुर्गंधी होईल कायमची दूर
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement